पिंपरी : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद आणि महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद या संस्थांच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा भाई वैद्य स्मृती श्रमसारथी पुरस्कार कामगार चळवळीत महत्वपूर्ण योगदान देणारे कुशल संघटक शिवाजीराव खटकाळे यांना जाहीर करण्यात आला आहे. असे वृत्त महाराष्ट्र ब्रेकिंग वृत्तसंस्थेने दिले.
निस्वार्थ बुद्धीने अखंड जीवन कामगारांच्या न्याय हक्काच्या रक्षणासाठी शिवाजीराव खटकाळे कार्यरत आहेत. लोकनेते भाई वैद्य यांच्या आचार आणि विचारांचा पाईक म्हणून शिवाजीराव खटकाळे यांची निवड करण्यात आली आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर या पुरस्कार कार्यक्रमाचे नियोजन योग्य परिस्थिती पाहून करण्यात येईल अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले आणि सुदाम भोरे यांनी दिली आहे.
शिवाजीराव खटकाळे हे राष्ट्रवादी कामगार सेल चे प्रदेक्षाध्यक्ष म्हणून कार्यरत असून विविध कामगार संघटनांचे सल्लागार म्हणून काम पाहतात. कामगार क्षेत्रातील दांडगा अभ्यास असणारे, कामगारांना न्याय मिळून देण्यासाठी सतत प्रयत्न करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. कामगार वर्गामध्ये 'भाऊ' या नावाने ते परिचित आहेत.
