ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस (AITUC) च्या आंध्रप्रदेश विजयनगरमचे जिल्हा सचिव बुगाटा अशोक यांनी आरोप केला की, केंद्र सरकारच्या नव्या कामगार संहितांचा केवळ उद्योगपती व कॉर्पोरेट घटकांना फायदा होईल, मजुरांना नाही. यावेळी कामगार संहितांच्या प्रतीही जाळण्यात आल्या आणि सरकारविरोधात घोषणा दिल्या. असे वृत्त द हिंदू वृत्तसंस्थेने दिले आहे.
श्री अशोक म्हणाले की पूर्वीच्या ४४ कामगार कायद्यांमुळे मजुरांच्या हिताचे रक्षण होते आणि नवीन कामगार कायद्यामुळे कामगार वर्गाचे नुकसान होणार आहे.
