सातारा : केसूर्डी, खंडाळा जि.सातारा येथील डॅटवायलर फार्मा एम्प्लॉईज युनिअन व डॅटवायलर फार्मा पॅकेजिंग इंडिया प्रा.लिमिटेड (Datwyler Pharma Packaging India Pvt. Limited) या दोन्ही उभयपक्षामध्ये त्रैवार्षिक वेतनवाढ करार यशस्वीरीत्या संपन्न झाला. एकूण वेतनवाढ रक्कम रु.१९,२५०/- करण्यात आली. कामगार संघटना व कंपनी व्यवस्थापनाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वेतनवाढ करार संपन्न केला.
सदर करार नुसार एकूण वेतनवाढ रक्कम रु.१९,२५०/- असून करार कालावधी दि. ०१ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२३ या ३ वर्षाकरिता लागू असेल.यामध्ये
प्रथम वर्षासाठी - रु.१०,०००/-
द्वितीय वर्षासाठी - रु.४,०००/-
तृतीय वर्षासाठी - रु.४,०००/-
हजेरी भत्ता : रु.२०००/- यामध्ये एक सुट्टी ग्राह्य धरली जाईल.
पालक वैद्यकीय विमा हा व्यवस्थापनाकडून ५०% देण्यात येईल.
दिवाळी बोनस : १६,८००/-
सुकन्या समृद्धी योजना १२ वर्षाखालील मुलींना २०,०००/- देण्यात येणार.
इतर मुद्दे :
कँटीन मध्ये जेवण व नाश्ता रु.५/- मध्ये
लग्नासाठी व्यवस्थापनाकडून रु.५,०००/- चे रोख गिफ्ट
१० वर्षे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यास १२,५००/- रु. रोख गिफ्ट
मयत कर्मचाऱ्याच्या वारसांना युनियन कडून जेवढी मदत केली जाईल तेवढीच रक्कम व्यवस्थापन देणार
कंत्राटी कर्मचारी यांना व्यवस्थापन नियमानुसार कायम करणार
नवीन ऑनरोल कर्मचारी वेतन हे रु.१५,०००/- (इन हॅन्ड) असेल
या करार वेळी डॅटवायलर फार्मा एम्प्लॉईज युनिअन वतीने अध्यक्ष गणेश तरडे, उपाध्यक्ष योगेश सावंत, चिटणीस विठ्ठल पाटील, चिटणीस राजेंद्र चव्हाण, सरचिटणीस धनंजय सुतार, खजिनदार नवनाथ येवले, संघटक प्रतिनिधी संकेत गाढवे व व्यवस्थापन तर्फे राहुल देव (मॅनेजिंग डायरेक्टर), राजीव नायडू ( एचआर हेड), मुकेश सूर्यवंशी (फॅक्टरी मॅनेजर), योगेश अहिरे (एचआर मॅनेजर), वेंकटेश राव (एचआर मॅनेजर), संदीप कांबळे (सेफ्टी ऑफिसर), अमित रेनुसे (मॅनेजर मिक्सिंग डिपार्टमेंट) उपस्थित होते.
