कामगार कोर्टाच्या आदेशाप्रमाणे बजाजच्या ३१ तात्पुरत्या कामगारांना (Temporary Workers) ३९ लाख रुपये भरपाई

औरंगाबाद : कामगार कोर्टाने बजाज कंपनीच्या ३१ तात्पुरत्या कामगारांना (Temporary Workers) ३९ लाख रुपये भरपाईचे आदेश दिले आहेत. न्यायाधीश डी.व्ही.जोशी आणि न्यायाधीश वी.एस. देशमुख यांनी या बाबत दोन स्वतंत्र निर्णय दिले. त्यानुसार बजाज कंपनीने ३१ पैकी २७ जणांना पैसे दिले आहेत आणि उर्वरित ४ जणांना २ मे रोजी धनादेश देण्यात येईल असे वृत्त लोकमत टाइम्स ने दिले आहे.

एकूण १९४ कामगार हे सन १९९० पासून कंपनीत वेल्डर, फिटर, टर्नर, मेकॅनिक आणि ग्राइंडर म्हणून अस्थायी कामगार (Temporary) म्हणून काम केले आहे, कामगारांनी अ‍ॅड.संदिप राजभोसले यांच्यामार्फत औरंगाबाद कामगार न्यायालयात तक्रार दाखल केली. ६० कामगार साक्ष देण्यासाठी कोर्टात हजर झाले. तक्रारीनुसार व्यवस्थापन कामगारांना फक्त ७ महिने काम देत असे तसेच व्यवस्थापनाने एकूण कामगारांच्या २४० दिवसाच्या सेवेचा गैरवापर केला आहे आणि व्यवस्थापनाने कायमस्वरूपी रोजगाराचा हक्क मिळू दिला नाही.

सदर अर्ज निकाली काढताना कामगार कोर्टाने कंपनीला त्यांच्या सेवेचा कालावधी व त्यांच्याद्वारे घेतलेल्या अंतिम पगाराची मोजणी करून त्यानुसार कामगारांना भरपाई देण्याचे आदेश दिले होते.

कोर्टाच्या आदेशानंतर कंपनीच्या व्यवस्थापनाने सर्व कार्यपद्धती पूर्ण केल्या व वरीलप्रमाणे ३१ कामगारांचे भरपाई दिली आहे. उर्वरित २९ तात्पुरत्या अस्थायी कामगारांचा निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे.

या करिता अ‍ॅड.संदिप राजभोसले यांनी अर्जदारांचे प्रतिनिधित्व केले. त्यांना अ‍ॅड.सुधीर कुमार घोंगडे, अ‍ॅड.गायत्री राजभोसले, अ‍ॅड.समृद्धी देशमुख-भैरव, आकाश बागल आणि दिनेश चव्हाण यांनी सहकार्य केले.