पुणे : रांजणगाव एमआयडीसी येथे शिवगर्जना कामगार संघटना व ईटन इंडस्ट्रियल सिस्टिम या दोन्ही उभयपक्षामध्ये पहिला वेतनवाढ करार यशस्वीरीत्या संपन्न झाला. एकूण वेतनवाढ रक्कम रु.१५,५००/- करण्यात आली. कोरोनाच्या परिस्थिती आणि जागतिक मंदी यामुळे तब्बल २४ हा महिने करार चालला, या संकट काळात कंपनी जवळपास १०९ दिवस बंद असताना देखील कामगार संघटना व कंपनी व्यवस्थापनाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वेतनवाढ करार संपन्न केला.
सदर करार नुसार एकूण वेतनवाढ रक्कम रु.१५,५००/- असून करार कालावधी दि. ०१ ऑक्टोबर २०१९ ते ३० सप्टेंबर २०२२ या ३ वर्षाकरिता लागू असेल.यामध्ये
प्रथम वर्षासाठी - रु.९,०००/-
द्वितीय वर्षासाठी - रु.३,२००/-
तृतीय वर्षासाठी - रु. ३,३००/-
यावरील १५,५००/- पैकी १४,५००/- रुपये निश्चित असून रु.१०००/- रुपये बदलती वाढ आहे.
फरक ची सर्व रक्कम एकरकमी रु.१ लाख ९६,०००/- करारानंतर सात दिवसात जमा होणार
करार वेळी व्यवस्थापन तर्फे शैलेंद्र शुक्ला, बाला वर्धराजन, प्रसन्ना आपटे,कौशल्य गावकर, शितल अरोरा, अश्विनी कुलकर्णी तर कामगार प्रतिनिधी तर्फे शिवगर्जना कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष संतोष (अण्णा) बेंद्रे, युनिट कमिटी सुनिल बांडे, किरण कामठे, दत्तात्रय आरगडे, गणेश पगारे, विजय महाजन उपस्थित होते.
कंपनीमधील सर्व कामगारांनी केलेले सकारात्मक काम, राखलेला सयंम , याच्या बळावर करार यशस्वी ,शांततामय वातावरणात संपन्न झाला अशी माहिती कामगार संघटनेमार्फत देण्यात आली.