ट्रेंड टेक्नॉलॉजीस इंडिया चाकण येथील कामगारांचे आंदोलन

चाकण : चाकण औदयोगिक वसाहतीमधील ट्रेंड टेक्नॉलॉजीस इंडिया प्रा.लि. येथील कामगारांनी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ (इंटक) यांचे सभासदत्व स्वीकारून संघटना स्थापन केली म्हणून व्यवस्थापन दबाव तंत्राचा वापर करत आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी कंपनीतील कामगारांनी काम करत असताना काळे फिती लावून निषेध आंदोलन दि.१५ मार्च पासून चालू केले अशी माहिती कामगार संघटनेने दिली. 

         कामगार संघटना स्थापन केली म्हणून कंपनी व्यवस्थापन दबावतंत्राचा वापर करत असून काही कामगारांना आरोपपत्र देऊन चौकशी लावणे, कामगारांना रजा न देणे, ठरलेल्या कामाव्यतिरिक्त जाणून-बुजून जास्त काम सांगणे या पद्धतीने कंपनी व्यवस्थापन वागत असून याचा निषेध करण्यासाठी दि.१२ मार्च पासून कंपनी मध्ये काम करत असताना सर्व कामगार काळी फिती लावून काम करत आहेत. याची दखल कंपनी व्यवस्थापन यांनी घ्यावी अशी मागणी कामगार संघटना करत आहे यावेळी महेश पाटील, अतुल बोऱ्हाडे, शामराव बिसेन, पंकज पाटील, कैलास वावगे, सचिन गोपनारायण, मछिंद्र वाळके कामगार प्रतिनिधी व कामगार उपस्थित होते.