ईएसआय कार्ड (ESI E-Pahchan Card) हे कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) योजनेंतर्गत नोंदणीकृत लाभार्थ्यांना दिले जाणारे आरोग्य कार्ड आहे. केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना चालविली जाते. १० पेक्षा जास्त कामगारांना नियुक्त केलेल्या कोणत्याही फर्म किंवा आस्थापनेस ईएसआय योजनेंतर्गत आपल्या कर्मचार्यांची नोंदणी करावी लागते.
ईएसआय योजनेअंतर्गत विमा उतरवलेल्या कर्मचार्यांना तसेच त्यांच्यावर अवलंबून असणार्यांना आजारपणासाठी तसेच इतर अनेक फायदे मिळतात.
ईएसआय पहचान कार्ड कसे मिळवाल (ESI E-Pahchan Card)
- ईएसआय पहचान कार्ड हे Employer / नियोक्ता यांनी कामगारांना देणे गरजेचे आहे.
- याकरिता तुम्ही काम करत असलेल्या व्यवस्थापन कडे ईएसआय पहचान कार्ड ची मागणी करा.
- ईएसआय पहचान कार्ड मिळाल्यानंतर त्यावरती कुटुंब फोटो चिटकवणे व यावरती Employer / नियोक्ता यांची सही व शिक्का घेणे.
- कर्मचारी राज्य राज्य विमा (ईएसआय) योजनेचे विविध लाभ घेण्यासाठी ईएसआय पहचान कार्ड (ESI E-Pahchan Card) आवश्यक आहे.