बीड : दि.२ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या बीड जिल्हा स्तरीय नियोजन समितीच्या बैठकी मध्ये पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी सांगितले कि, ऊसतोड कामगारांसाठी निर्माण केलेल्या महामंडळाची राज्य व केंद्र सरकारच्या पातळीवरील नोंदणी व मंजुरी प्रक्रिया होऊन लवकरच याबाबतचा कायदा राज्य शासनाकडून अंमलात येईल. ऊसतोड कामगारांच्या मुला मुलींसाठी वसतिगृहे सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून बीड सह अहमदनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये देखील ही वसतिगृहे सुरू केली जातील; बीड जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात एक वसतिगृह उभारण्यात येणार असल्याची घोषणा ना. मुंडे यांनी यावेळी केली.
राज्य शासनाने यावर्षी जानेवारी मध्ये निधी उपलब्ध करून दिला आहे परंतु आर्थिक वर्ष संपत असल्याने कमी कालावधीमध्ये कामे करण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे सदर निधी खर्च करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठीदेखील राज्य शासन स्तरावर प्रयत्न करू असे ना. मुंडे म्हणाले.