चाकण : येथील प्रिसिजन सिल्स एम्प्लॉईज युनियन व प्रिसिजन सिल्स मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड, नाणेकरवाडी,चाकण, पुणे यांच्यामध्ये वेतनवाढीचा करार संपन्न झाला.
सदर करारा मध्ये महागाई शी लिंक पगारवाढ देण्याचे मान्य करण्यात आले. दि.१ जानेवारी २०२० ते दि. ३१ डिसेंबर २०२३ या चार वर्षाच्या कालावधीसाठी सध्याच्या ( ३१ डिसेंबर २०१९ रोजीच्या ) सरासरी पगारावरती कमीत कमी ८% (आठ टक्के ) व जास्तीत जास्त १०% (दहा टक्के ) महागाई शी लिंक पगारवाढ देण्याचे मान्य करण्यात आले. म्हणजेच वार्षिक आठ टक्के पेक्षा कमी टक्के महागाई वाढ झाली तरी आठ टक्के पगारवाढ मिळेल किंवा वार्षिक दहा टक्क्यांपेक्षा जास्त महागाई वाढली तरीही दहाच टक्के पगारवाढ मिळेल किंवा आठ ते दहा मध्ये प्रत्यक्ष महागाई मध्ये जी वाढ झाली असेल त्या प्रमाणात पगारवाढ मिळेल.
प्रिसिजन सिल्स मॅन्युफॅक्चरिंग च्या कामगारांना या करारानुसार चार वर्षासाठी किमान बारा हजार रुपये ते कमाल तेरा हजार सहाशे रुपये पगारवाढ मिळणार आहे. कोविड साथीच्या महामारी मध्ये औद्योगिक अस्थिरता असतानाही अतिशय चांगल्या प्रकारचा, औद्योगिक शांतता टिकवणारा हा करार इतर कंपन्यांसाठी व कामगार संघटनांसाठी निश्चितच पथदर्शी ठरेल असा विश्वास ऑप्शन पाॅझिटीवह चे संचालक अरविंद श्रृती सर व सिनियर जनरल मॅनेजर, एच आर श्री मोहन पाटील सर - बाॅश चॅसिस सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. चाकण यांनी व्यक्त केला.
सदर करारा वेळी कंपनी च्या वतीने प्लांट हेड अशोक पाटील, मॅनेजर, एच.आर. परेश वाणी , एच आर पी एस एम एल इंद्रजित येळे, सिनियर मॅनेजर फायनान्स अभिषेक कन्नल यांनी करारावर सह्या केल्या. संघटनेच्या वतीने अध्यक्ष सुबोध बेहेळे, उपाध्यक्ष पंकज शिंदे, उपाध्यक्ष संतोष शेळके, जनरल सेक्रेटरी विजय मांढरे ,सहसचिव लहु गायकवाड, खजिनदार संपत कौदरे, कार्यकारी सदस्य दिपक साळुंके, अर्जुन घुले, ओमप्रकाश जैन यांनी करारावर सह्या केल्या.
श्रमिक एकता महासंघ अध्यक्ष दिलीप पवार, महासंघाचे प्रमुख सल्लागार मारुती जगदाळे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर केशव घोळवे, जनरल सेक्रेटरी मनोज पाटील व महासंघाची कार्यकारिणी, श्रमिक एकता महासंघ महिला कमिटी अध्यक्षा विद्या तांबे, इंडस्ट्री ऑल ग्लोबल युनियन, इंटरनॅशनल ऑटोमोटीवह वर्कर्स को.ऑरडीनेशन च्या सहकार्यातून हा करार संपन्न झाला.