कामगार संघटनेने कामगार आयुक्त यांच्याकडे केली तक्रार.
मुंबई : महावितरण, प्रकाशगड येथे मागील १० ते १५ वर्षांपासून कंत्राटी कामगार कार्यरत असून यांना माहे डिसेंबर २०२० व जाने २०२१ या दोन महिन्याचा पगार मिळाला नसून याबाबत कामगार आयुक्त मुंबई तक्रार केली असून याची माहिती मुख्य महाव्यवस्थापक महावितरण प्रकाश गड, डॉ.रघुनाथ कुचिक अध्यक्ष किमान वेतन सल्लागार मंडळ, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महावितरण प्रकाश गड, अध्यक्ष व सरचिटणीस महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ यांना देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ मुंबई विभाग अध्यक्ष सुनील कांबळे यांनी दिली.
वीज कंत्राटी कामगारांना प्रचलित कामगार कायद्यानुसार माहे २०२० व जानेवारी २०२१ पगार मिळाला नसून जागतिक दर्जाचे राहणीमान असणाऱ्या मुंबई महानगरांमध्ये किमान वेतनावर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना वेळेत होणे ही बाब अत्यंत खेदजनक आहे. कामगार कंत्राटी कामगार नियमन व निर्मूलन कायदा १९७० चे कलम क्रमांक २१ (४) नुसार हे वेतन व्यवस्थापनाच्या वतीने लवकरात लवकर करण्याच्या सूचना देण्यात याव्यात आणि सुमारे २५० संख्या असणाऱ्या मुंबईतील महावितरण मधील कार्यरत सर्व कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी कामगार आयुक्त मुंबई यांना यावेळी करण्यात आली.
- डॉ.रघुनाथ कुचिक अध्यक्ष,