मुंबई : नवीन कामगार संहिता बाबत कामगार संघटनांचे मते जाणून घेण्याकरीता कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मुंबई येथे विविध कामगार संघटना प्रतिनिधी, पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने २९ कामगार कायद्यातील तरतुदी एकत्रित करून वेतन संहिता, औद्योगिक संबंध संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्यस्थळ परिस्थिती संहिता तयार केल्या असून लवकरच याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवरती नवीन कामगार कायदे बाबत महाराष्ट्रातील विविध कामगार संघटना, प्रतिनिधी यांची मते जाणून घेण्याबाबत कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कडे सोमवारी बैठक आयोजित असून विविध संघटनाच्या पदाधिकारी यांना बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.