महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेश शिक्षण शिष्यवृत्ती, क्रीडा शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य योजना यांचे ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक २५ फेब्रुवारी २०२१ असून जास्तीत जास्त कामगारांनी या योजनांचा लाभ घ्यावा.
अर्ज सादर करण्याची पद्धत :
कामगार स्वतःसाठी आपल्या पाल्यासाठी असलेल्या आर्थिक लाभाच्या योजना आपल्या घरी बसुन मोबाईलवर मंडळाने लाँच केलेल्या 'महाकल्याण' या ॲपवर घेऊ शकतो तसेच https://public.mlwb.in या संकेत स्थळावर जाऊनही कामगार किंवा कामगार पाल्य मंडळाच्या विविध योजनांसाठी आपला अर्ज सादर करु शकतो यासाठी मंडळाकडून प्रत्येक कामगांरास दिलेला लिन नंबर हा यूजर नेम म्हणून तर कंपनीकडे त्याने रजिस्टर केलेला मोबाईल नंबर हा पासवर्ड म्हणून वापरावा लागेल.
"कामगारांनी ऑनलाईन अर्ज करताना सर्व मूळ कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करावेत, तसेच अर्ज करताना जे केंद्र निवडले आहे त्या संचालकांशी संपर्क साधून अर्ज बरोबर भरला असल्याची खात्री करून घ्यावी. चुकीचे किंवा अस्पष्ट कागदपत्रे अपलोड केले तर अर्ज बाद होईल." - प्रभारी सहाय्यक कल्याण आयुक्त समाधान भोसले,पुणे विभाग