EPFO : डिसेंबर २०२० मध्ये १२.५४ लाख नवीन नोंदणी

ईपीएफओने २० फेब्रुवारी २०२१ ला प्रकाशित केलेल्या तात्पुरत्या वेतन आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२० मध्ये १२.५४ लाख ग्राहकांची भर पडल्यामुळे निव्वळ ग्राहक आधारित वाढीचा सकारात्मक कल अधोरेखीत झाला. मागील महिन्याच्या म्हणजेच नोव्हेंबर २०२० च्या तुलनेत  निव्वळ ग्राहकांची ४४ % वाढ दिसून आली.

वर्षाच्या तुलनेत, डिसेंबर २०२० मध्ये झालेली वाढ ईपीएफओच्या ग्राहक वाढीचा कोविड पूर्व स्तरावरील परतावा दर्शविते.

कोविड -१९  महामारी असतानाही, चालू आर्थिक वर्षाच्या  पहिल्या तिमाहीत ईपीएफओशी सुमारे ५३.७० लाख ग्राहक जोडले गेले.चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत निव्वळ वेतनपटाची २२ टक्के इतकी जोरदार वाढ नोंदविण्यात आली.

कोविड- १९ महामारीदरम्यान भारत सरकारने, एबीआरवाय, पीएमजीकेवाय आणि पीएमआरपीवाय योजनांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेचे औपचारिकीकरण करण्याच्या  धोरण समर्थनार्थ ईपीएफओने सुलभ आणि अखंडित सेवा सुविधेसाठी, अलीकडेच केलेल्या ई- उपाययोजनांना, ईपीएफओमधल्या वेतनपट वाढीचा कल आणि ग्राहकाधारीत  गतिमान सदस्यता विस्तार याचे श्रेय अंशतः श्रेय दिले जाऊ शकते.

भारतात कोविड - १९ रुग्णांची सक्रिय संख्या कमी झाल्यामुळे कर्मचारी आपल्या  नोकऱ्यांच्या ठिकाणी परतत आहेत, हे सदस्य संख्या वाढते आहे याचे  दर्शक आहे. पुढे, ईपीएफओने सुरू केलेल्या ऑटो - ट्रान्सफर सुविधेमुळे, अनेक प्रकरणांमध्ये नोकरी बदलल्यानंतर जुन्या खात्यातून नवीन खात्यात पीएफ शिल्लक विना अडथळा हस्तांतरित करणे शक्य झाले आहे.

राज्यांमधल्या वेतन आकडेवारीच्या तुलनेत असे दिसून आले आहे की, महाराष्ट्र , गुजरात, हरयाणा, तामिळनाडू आणि कर्नाटक ही राज्ये रोजगार निर्मितीत  आघाडीवर आहेत.