कोल्हापूरचे कामगार नेते संजय पाटील काँग्रेसच्या संसदीय समितीवर

कोल्हापूर : अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी नुकतीच ३७ जणांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पार्लमेंटरी बोर्ड संसदीय समिती यादी जाहीर केली. या यादीमध्ये कर्मचारी संघर्ष युनियन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

       संजय पाटील हे अखिल भारतीय किसान काँग्रेसचे स्टेट चेअरमन म्हणून गेली दोन वर्षे काम पाहत आहेत तसेच कामगार कर्मचारी संघर्ष युनियन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत. संजय पाटील यांनी गेल्या वीस वर्षात सर्वसामान्यांच्या तसेच शेतकरी, कामगार, कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेऊन शेकडो आंदोलने केलेली आहेत. कामगार कर्मचारी संघर्ष युनियन च्या माध्यमातून सर्व प्रकारच्या संघटित, असंघटित कामगार, कर्मचारी यांना न्याय मिळवून देण्याचे काम ते करत असून कामगार क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संजय पाटील यांनी संघटन बांधले आहे. त्याच्या नियुक्तीने कामगार वर्गाला प्रतिनिधित्व प्राप्त झाले आहे.