इलजिन ग्लोबल इंडिया प्रा.लि.खंडाळा, जि.सातारा येथे वेतनवाढ करार संपन्न

खंडाळा : दिनांक १८ फेब्रुवारी २०२१ रोजी खंडाळा एमआयडीसी ता. खंडाळा, जि.सातारा मधील इलजिन ग्लोबल इंडिया प्रा.लि. या कंपनीत शिवगर्जना कामगार संघटना व इलजिन ग्लोबल इंडिया प्रा.लि. (iljin Global India Private Limited) व्यवस्थापन यांच्या मध्ये वेतनवाढ करार संपन्न झाला.

    सदर करार नुसार रु.१६,००० /- रुपये इतकी भरघोस वेतनवाढ ३ वर्षां साठी करण्यात आली आहे. वेतनवाढ कालावधी १ फेब्रुवारी २०२१ ते ३१ जानेवारी २०२४ असा राहील. पहिल्या वर्षी ६०%, दुसऱ्या वर्षी २०% आणि तिसऱ्या वर्षी २०% अशी वेतनवाढ विभागणी करार करण्यात आला. अगोदरचा कामगारांचा पगार १२,७०० रुपये इतका असताना त्यामध्ये १४०% वाढ झालेली आहे. तसेच या करारामधून कामगारांना इन्शुरन्स पॉलिसी, व इतर भत्ते या सर्व सोयी सुविधा मिळणार आहेत. मेडीक्लेम ३ लाख रुपये पर्यंत तसेच GPA १५ लाख इतका करण्यात आला. सदरचा झालेला करार हा सातारा औद्योगिक नगरीमध्ये सर्वात मोठा करार झालेला आहे. या भरघोस झालेल्या वेतन वाढीमुळे कामगार वर्गात अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

    करारावरती स्वाक्षरी करताना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते श्री.संतोष (आण्णा) बेंद्रे, अ‍ॅड.श्री.गौरव पोळ, संघटनेचे पुणे जिल्हा संघटक श्री.सुदर्शन नंदखिले, श्री.सुरज पवार, श्री.राहुल बोडरे श्री.बालाजी खंकाळ, श्री. दत्ता शिंदे, श्री.अक्षय सोनवणे व इलजिन ग्लोबल इंडिया युनिट प्रतिनिधी तेजस पवार, मिलिंद तरडे, स्वप्नील कोळसे, महेश ननावरे, स्वप्नील देशमुख, सुधीर सावंत, आशिष स्वामी, संतोष गावडे आदी उपस्थित होते. व्यवस्थापनाच्या वतीने कंपनी चे वरिष्ठ अधिकारी श्री.जंग बी.जी, श्री. बी.जी.किम, श्री.ये. ब्यूंग. इल, श्री.धर्मेंद्र परमार, एच. आर. श्री. भास्कर पोमन, श्री. धीरज गाढवे, व इतर व्यवस्थापन आधिकारी उपस्थित होते. कराराचा कार्यक्रम शांततेत व आनंदीमय वातावरणात साजरा झाला. संघटनेतील सर्व कामगारांनी पेढे वाटुन, फटाक्याची आतिषबाजी करुन आनंद साजरा केला.