अखिल भारतीय पातळीवर स्थलांतरीत कामगार सर्वेक्षण

नवी दिल्ली : केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाशी संलग्न कामगार मंडळाकडे अखिल भारतीय पातळीवरील स्थलांतरित कामगारांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

      कामगार मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणाच्या वेळापत्रकाचे परीक्षण करून त्याला अंतिम स्वरूप देणे, नमुन्याचे आरेखन आणि इतर तंत्रज्ञानविषयक तपशील निश्चित करणे यासाठी भारत सरकारने ९ सप्टेंबर २०२० रोजी तज्ज्ञ गटाची स्थापना केली आहे. 

     केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी लोकसभेत ही माहिती दिली.