मुंबई : बांधकाम कामगार तसेच विविध कामगारांच्या मागण्या यासंदर्भात राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजप कामगार आघाडी प्रदेशअध्यक्ष गणेश ताठे, सरचिटणीस व पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपमहापौर केशव घोळवे, सरचिटणीस प्रमोद जाधव, उपाध्यक्ष अमित कदम इतर पदाधिकारी उपस्थित होते.
प्रमुख मागण्या :
- बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी पद्धत बंद करण्यात यावी.
- बांधकाम कामगारास पूर्वीप्रमाणे अवजार खरेदीसाठी रु.५०००/- अनुदान मिळावे.
- मंडळाच्या राज्यातील जिल्हा कार्यकारी अधिकारी व उपजिल्हा कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या तात्काळ कराव्यात.
- मंडळाच्या वतीने नोंदीत कामगार यांना देण्यात येणाऱ्या गंभीर आजार योजनेत ब्लडप्रेशर, शुगर, मणक्याचे आजार व इतर हाडांचे आजार, एड्स, कोरोना (कोविड १९) आजारांचा समावेश करण्यात यावा.
- मयत कामगार अर्थसहाय्य २ लाख करिता वय अट १८ ते ६० करण्यात यावी.
- बांधकाम कामगार नोंदणी पद्धत मधील जाचक अटी शिथिल कराव्यात.