शिरूर : कामगार क्षेत्रामध्ये कार्य करणारे, कामगार नेतृत्व, पिंपरी- चिंचवड महारनगरपालिका नवनिर्वाचित उपमहापौर केशव घोळवे यांचा विविध कामगार संघटना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. श्रमिक एकता महासंघाशी संलग्न असलेल्या पुणे नगर रोड च्या सर्व संघटना उपस्थित होत्या तसेच या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर कामगार संघटनेने केले होते..
यावेळी संजय पाचंगे,अध्यक्ष क्रांतिवीर प्रतिष्ठान तसेच पुणे जिल्हा उद्योग आघाडी, गणेश ताठे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कामगार आघाडी, संतोष भुजबळ श्रमिक एकता महासंघ कार्याध्यक्ष त्याच बरोबर बहुसंख्य कामगार व कामगार संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.
कामगारांना मार्गदर्शन करता असताना रांजणगाव एमआयडीसी मधील कामगार व कामगार संघटना यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील त्याचबरोबर नगर-पुणे रोड वरील कामगार संघटना यांनी एकत्र येऊन असोसिएशन स्थापन करावी असे मत कामगार नेते, उपमहापौर केशव घोळवे यांनी व्यक्त केले.