PF बॅलन्स चेक करण्याची पद्धत

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघठन (EPFO) हे आपल्याला वेबसाईट द्वारे EPF पासबुक द्वारे तसेच SMS, मिस्ड कॉल द्वारे, मोबाईल App द्वारे देखील PF बॅलन्स चेक करण्याच्या सुविधा देतात. त्या खालील प्रमाणे 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघठन EPFO वेबसाईट द्वारे :
  • www.epfindia.gov.in वेबसाईट ओपन करा.
  • Services मध्ये - For Employees वरती क्लिक करा.
  • Member Passbook वरती क्लिक करा.
  • तुमचा UAN नंबर व पासवर्ड टाकून लॉगिन करा. Membar ID सिलेकट करून पासबुक मध्ये PF बॅलन्स चेक करा. व पासबुक डाउनलोड करा.

मोबाईल SMS द्वारे :
  • ज्या कामगारांचा UAN नंबर ऍक्टिव्ह आहे. त्यांनी 7738299899 या नंबर वरती मेसेज करून PF बॅलन्स चेक करू शकतात.
  • रजिस्टर्ड मोबाईल नं. वरून सदर मेसेज करावा लागेल.
  • मेसेज सुविधा १० भाषांमध्ये उपलब्ध असून यामध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी व इतर भाषा उपलब्ध असून ज्या भाषेमध्ये pf चेक करायचा आहे त्या भाषेचे पहिली तीन कैरेक्‍टर ला UAN नं. नंतर जोडावे लागेल. उदा. इंग्रजी मध्ये EPFOHO { UAN No } ENG आणि 7738299899 या नंबर वरती SMS करा.

मिस्ड कॉल द्वारे PF बॅलन्स चेक :
  • कामगार 9966044425 या नंबरती मिस्ड कॉल देउन बॅलन्स चेक करू शकतो.

मोबाईल App द्वारे :
  • मोबाईल मध्ये Umang App द्वारे बॅलन्स चेक करू शकतो.