सनफ्रेश अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज मध्ये वेतनवाढ करार

 


श्रीरामपुर :  येथील सनफ्रेश अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज मध्ये प्रथम त्रैवार्षिक वेतनवाढ करार संपन्न झाला. सदर करार नुसार दि.१ जानेवारी २०२० पासून लागू करण्यात आला. प्रत्यक्ष एकूण पगार वाढ रु.९०००/- यामध्ये प्रथमवर्षी रु.५०००/- द्वितीय वर्षी रु.२०००/- तृतीय वर्षी रु.२०००/-, दिवाळी बोनस ८.३३% प्रमाणे दिवाळी बोनस करण्यात आला.

             महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कामगार सेल शिवाजीराव खटकाळे, संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब पोटे व सर्व  युनियन पदाधिकारी व मॅनेजमेंटच्या वतीने कंपनीचे सीईओ राजीव मित्रा , सीईओ व लॅक्टलीस इंडियाचे हेड फेड्रिक व कंपनीचे HR मॅनेजर श्री संदीप इगे, इंडस्ट्रियल डायरेक्टर विनीत शहा, माधव पाडगावकर मुंबई प्लांट डायरेक्टर यांच्या उपस्थित वेतन वाढीच्या कराराच्या MOU वर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी संघटनेच्या वतीने रफिक पटेल, सुदर्शन बोंबले, भारत डोखे, सचिन गिरमे, अजित गिरमे, रफिक सय्यद काका, वनी संतोष केदारी, महेश ढोक चवळे, अनिल जाधव, अण्णा डांगे, प्रवीण भागवत, इरफान शेख व संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते.