संघटित, असंघटित कामगार, कामगार संघटना यांचा कामगार कायद्याविरोधात आक्रोश

 


पुणे : कामगार व शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी पुणे शहरात कामगार रस्त्यावर उतरले. कामगारांच्या हातात केंद्र सरकारच्या विरोधातील आणि मागण्यांचे फलक होते. असंघटित कामगार, महिला कामगारांची संख्याही लक्षणीय होती. विविध कामगार संघटना यांनी यामध्ये भाग घेतला. विविध ठिकाणी कामगारांनी मानवी साखळी हातात फलक घेऊन कामगार विरोधी कायद्यांचा निषेध केला.
        
       शहरामध्ये विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले . ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव, कॉ.अजित अभ्यंंकर, भारतीय कामगार सेने डॉ.रघुनाथ कुचिक, कामगार कृती समिती अध्यक्ष कैलास कदम, श्रमिक एकता महासंघ अध्यक्ष दिलीप पवार, केशव घोळवे उपमहापौर पिंपरी चिंचवड, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ अध्यक्ष किशोर ढोकले, मा.नगरसेवक मारुती भापकर, मानवजी कांबळे, वसंत पवार, प्रहार पक्ष संघटक नीरज कडू, नंदकिशोर जगदाळे असंख्य कामगार नेते व संघटनेच्या अनेक प्रतिनिधि व कामगार नेत्यानी कामगारानां मार्गदर्शन केले व हा लढा जो पर्यंत कामगार कायदे मागे घेत नाही तो पर्यंत हा लढा चालू राहिल असे सांगितले.

"करोना संसर्ग या संधीचा केंद्र सरकार ने लाभ उचलून मालक धार्जिणे कायदे संसदेत अति जलद गतीने समंत करुण घेतले. 'मन की बात ही आता मनमानी की बात होत आहे.' देश का मजदूर, किसान जवाब की माँग कर रहा है.. हि मैदानी व कायदेशीर लढाई आम्ही अजुन तीव्र करणार आहोत. करोना कालावधीमध्ये सामाजिक, आरोग्य हित लक्षात घेऊन टप्याटप्याने लढा पुढे जाईल."

- डॉ.रघुनाथ कुचिक
शिवसेना उपनेता,सरचिटणीस ,भारतीय कामगार सेना

"केंद्र सरकार ने कामगार कायदे मागे घ्यावे व पूर्वीचे कायदे कायम ठेवावे. जो पर्यत कायदे मागे घेतले जात तो पर्यत आंदोलन चालू राहिल."

- श्री.दिलीप पवार
अध्यक्ष , श्रमिक एकता महासंघ 

"नवीन कामगार कायदे तयार करताना कामगारांचे हित न पाहता उद्योगपती यांचे हित पाहिल्या गेले आहे त्याचा आम्ही निषेध करतो. भविष्यामध्ये कामगार लढा अधिक तीव्र करणार आहोत."

- श्री.किशोर ढोकले
अध्यक्ष, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ