कामगार नामा ट्रस्ट आयोजित POSH कायद्यावरील ऑनलाईन कार्यशाळा संपन्न

पुणे : कामगार नामा ट्रस्ट (F-0066327/PUN) यांच्यावतीने 'POSH कायदा - कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध (Prevention of Sexual Harassment at Workplace Act, 2013)' या विषयावरील ऑनलाईन कार्यशाळा रविवार दि. 06 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत उत्साहात संपन्न झाली.

    या कार्यशाळेचे मार्गदर्शक म्हणून कंपनी क्षेत्रातील 54 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले ज्येष्ठ HR तज्ज्ञ, कामगार कायदे सल्लागार व विविध कामगार संघटनांना मार्गदर्शन करणारे श्री. विभाकर रामतीर्थकर यांनी मार्गदर्शन केले.

श्री. रामतीर्थकर यांनी या कार्यशाळेत अतिशय महत्त्वाचे मुद्दे सोप्या भाषेत समजावून सांगितले:

1)  POSH कायद्याची आवश्यकता का आहे? आणि 10 पैकी 9 कंपन्यांमध्ये कोणती चूक होते?

2)  POSH धोरण (Policy) कसे बनवावे?

3)  अंतर्गत समिती - Internal Committee (IC) ची स्थापना कशी व कोणत्या सदस्यांसह करावी?

4)  लैंगिक छळाची तक्रार आल्यावर चौकशीची तत्त्वे आणि प्रक्रिया काय असावी?

5)  अहवाल कसा लिहावा?

6)  नोंद, नोंदणी आणि वार्षिक अहवाल जिल्हा अधिकाऱ्याकडे सादर करणे कसे?

    त्यांनी सांगितले की, 10 पेक्षा जास्त कामगार असलेल्या प्रत्येक कंपनीत IC असणे बंधनकारक आहे, अन्यथा रु. 50,000/- पर्यंत दंड व परवाना रद्द होण्याची तरतूद आहे. तरीही आज अनेक कंपन्यांमध्ये IC नाही किंवा ती केवळ कागदावर आहे. त्यामुळे या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे आहे.

   या ऑनलाईन कार्यशाळेला पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर औद्योगिक पट्ट्यातील विविध कंपन्यांचे HR अधिकारी, कामगार अधिकारी, Compliance Officer, Internal Committee चे सदस्य, कामगार प्रतिनिधी आणि महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

   सहभागींनी विचारलेल्या विविध केस-स्टडी वरील प्रश्नांना श्री. रामतीर्थकर यांनी आपल्या 54 वर्षांच्या अनुभवातून सविस्तर उत्तरे दिली. ही कार्यशाळा कामगार, HR आणि IC सदस्यांसाठी खास उपयुक्त ठरली. 

आयोजक: कामगार नामा ट्रस्ट
संपर्क: 8983070380 | www.kamgarnama.com