कामगार नामा ट्रस्टच्या वतीने ESI कायद्यावर ऑनलाईन कार्यशाळा संपन्न

शिरूर / पुणे, दि. 20 सप्टेंबर 2026 - कामगार नामा ट्रस्ट (F-0066327/PUN) आयोजित "ESI कायदा - संपूर्ण मार्गदर्शन" या विषयावरील ऑनलाईन कार्यशाळा आज दि. 20 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत उत्साहात संपन्न झाली.

या कार्यशाळेचे मार्गदर्शक म्हणून कंपनी क्षेत्रातील 54 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले श्री. विभाकर रामतीर्थकर सर लाभले. त्यांनी ESI कायद्याची पार्श्वभूमी, 7 मोठे फायदे, कव्हरेज, कॉन्ट्रिब्युशन कसे व किती धरावे, कोणते रेकॉर्ड ठेवावे, कंत्राटदारांची जबाबदारी आणि दंडाची तरतूद यावर सखोल मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत कामगार, कामगार प्रतिनिधी, HR अधिकारी, अंतर्गत समिती सदस्य मोठ्या संख्येने ऑनलाईन सहभागी झाले होते. सहभागींनी विचारलेल्या प्रश्नांना मार्गदर्शकांनी समर्पक उत्तरे दिली.

कामगारांना कायद्याचे ज्ञान मिळावे या हेतूने कामगार नामा ट्रस्ट अशा विविध कायद्यांवर कार्यशाळा घेत असते. यापुढेही अशा उपयुक्त कार्यशाळा आयोजित केल्या जातील असे ट्रस्टच्या वतीने कळविण्यात आले आहे.

संपर्क: 8983070380