विशेष महागाई भत्त्याचा लाभ देण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर,: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कार्यरत असलेल्या रोजंदारी कामगारांना कुशल व अकुशल या वर्गवारीप्रमाणे महाराष्ट्र शासनाने निर्धारीत केलेल्या महागाई भत्त्याचा लाभ पुढील महिन्यातील वेतनात थकबाकीसह समावेश करून देण्यात यावा असे निवेदन भिमशक्ती रोजंदारी कर्मचारी युनियन यांच्या वतीने विद्यापीठाचे कुलसचिव यांना देण्यात आले अशी माहिती अध्यक्ष किरणराज पंडित यांनी दिली.

    निवेदनात म्हटले आहे कि, महाराष्ट्र शासन किमान वेतन अधिनियम १९४८ अंतर्गत अनुसुचित उद्योगातील कामगांराकरीता विशेष महागाई भत्याची रक्कम दि.०१/०१/२०२६ ते ३०/०६/२०२६ या सहा महिन्याच्या कालावधीकरीता परिमंडळ एक अनुसार विशेष महागाई भत्ता रूपये ३९००/- प्रमाणे प्रति महिना जाहिर केलेला आहे.

    परिमंडळ एक अनुसार कुशल कामगारांचे मुळ वेतन दर ११,६३२/- विशेष महागाई भत्त्याची रक्कम ३,९००/- एकुण किमान वेतन १५,५३२/-, अकुशल कामगारांचे मुळ वेतन दर १०,०२१/- विशेष महागाई भत्त्याची रक्कम ३,९००/- एकुण किमान वेतन १३,९२१/- प्रमाणे आहे. कामगारांना विशेष महागाई भत्त्याचा लाभ वेतनात समाविष्ट करून देण्यात यावा. अशा स्वरूपाचे निवेदन कुलसचिव यांना देण्यात आले.