पिंपरी : कासारवाडी येथील सिमंडस मार्शल लिमिटेड व मार्शल कामगार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात २९३ जणांनी रक्तदान केले. पिंपरी चिंचवड रक्तपेढीच्या सहकार्याने मार्शल कामगार संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत भोर यांच्या पुढाकाराने हे शिबिर पार पडले असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी कंपनीचे व्यवस्थापक कृष्णमोहन, एचआर विभागाचे प्रमुख नितीन दबडे, मार्शल कामगार संघाचे उपाध्यक्ष आशुतोष शिंदे, सेक्रेटरी सचिन जाधव, खजिनदार गणेश बाराथे तसेच कंपनीचे अधिकारी रुशाद गोकल व मच्छिंद्र ढवळे उपस्थित होते. या वेळी पिंपरी चिंचवड रक्तपेढीचे डॉ. कमलेश यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद केले. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन नारायण गुरव, अभिजित वैराळे, राजशेखर आचार्य, राकेश चासकर, सुग्रीव यादव, अमोल सावंत, सचिन चासकर, सूरज जेटीथोर, मगन वसावे तसेच इतर कामगार व कर्मचाऱ्यांनी केले. कंपनीचे संचालक नवरोझ मार्शल यांनी सर्व कामगार व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

