पुणे : चाकण येथील सोजेफी एडीएम सस्पेंन्शन प्रा.लि. (Sogefi ADM Suspensions Pvt. Ltd.) कंपनी व्यवस्थापन आणि शिवगर्जना कामगार संघटना यांच्यामध्ये दि.०३/१०/२०२५ रोजी चांगल्या आनंदी आणि उत्साही वातावरणामध्ये वेतनवाढ करार संपन्न झाला.
कराराची ठळक वैशिष्ट्ये :
कराराचा कालावधी : दि. ०१/०४/२०२४ ते दि.३१/०३/२०२७ असा तीन वर्षांचा राहणार आहे.
पहिल्या वर्षीसाठी - रु.३५००/-
दुसऱ्या वर्षीसाठी - रु.३०००/-
तिसर्या वर्षीसाठी - रु.२०००/-
आणि प्रोडक्शन इन्सेन्टीव्ह रु.२०००/- एवढा झाली आहे.
मेडीक्लेम : रुपये २ लाख तर बफर मध्ये रुपये ५ लाख करण्यात आला
लिव्ह पॉलिसी : यानुसार वार्षिक रजा EL -१५,SL- ०७,CL-०७ अशा वार्षिक रजा मिळाल्या तर वार्षिक पेड हॉलिडे ०८ देण्याचे मान्य केले.
वर्षाला दोन टी-शर्ट व एक सेफ्टी शूज देण्याचे ठरले.
वर्षातुन एकदा स्नेहसंमेलनाचे व सर्वांना भेटवस्तू देण्याचे मान्य करण्यात आले.
तरी या वेतनवाढ करारासाठी व्यवस्थापनच्या वतीने सीईओ (CEO) दिपक त्यागी, आँपरेशन हेड अमित शर्मा, सीएफओ (CFO) महेश गोळे, एच आर (HR) राहुल कुमार तसेच संघटनेच्या वतीने शिवगर्जना कामगार संघटना संस्थापक (अध्यक्ष) संतोष (आण्णा) बेंद्रे, उपाध्यक्ष हौसीराम कर्डीले युनियन कमिटी शिवनंदन सिंह, अनिल भोसले, अमर चौगुले, नामदेव खोंडे, शैलेश वानखेडे आणि सर्व युनियन सभासद तर उपस्थित होते.

