राज्यामध्ये विविध कंपनी, आस्थापना कामगार विषयक कोणतेही पत्र किंवा करार, नियुक्ती पत्र तसेच अन्य कामगार विषयक बाबी यामध्ये इंग्रजी भाषेचा वापर करतात. महाराष्ट्र राज्यामध्ये काम करणारा संघटित कामगार तसेच असंघटित कामगार सर्वांनाच इंग्रजी भाषा येते किंवा समजते असे नाही. त्यामुळे बहुतांश कामगार यांना कंपनीने दिलेल्या कागदपत्रांचा अर्थ समजत नाही व कामगारांचे यामुळे नुकसान देखील होते याचा बहुसंख्य ठिकाणी गैरफायदा काही कंपनी व्यवस्थापन घेताना दिसतात.
त्याचबरोबर कामगार आयुक्त, उपायुक्त कार्यालय येथे कामगार विषयक प्रकरण चालू असताना बहुसंख्य कंपनी व्यवस्थापन इंग्रजी भाषेचा वापर करून पत्र व्यवहार करतात. यामुळे संबंधित प्रकरणामधील कामगार यांना यासर्व कागदपत्र यांचे संपूर्ण अवलोकन होत नाही. यामुळे बऱ्याच कामगारांचे नुकसान होताना दिसते.
महाराष्ट्राची मातृभाषा मराठी असून कामगार विषयक सर्व कागदपत्रे व पत्रव्यवहार मराठीमध्ये केल्यास असंख्य कामगारांचे होणारे नुकसान थांबविले जाईल. यावरती शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन सर्व कंपनी,आस्थापना,कामगार कार्यालये यांना मराठी भाषेचा वापर करण्यास सांगणे गरचेचे आहे.
