चिंचवडमध्ये एक्साइड इंडस्ट्रीज लि. येथे आयटीआयच्या औद्योगिक व्यवस्थापन समितीची यशस्वी बैठक

पुणे : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक व्यवस्थापन समितीची (IMC) एक अत्यंत महत्त्वाची बैठक एक्साइड इंडस्ट्रीज लि., चिंचवड येथे (दि.३ सप्टेंबर) नुकतीच पार पडली. या बैठकीचा मुख्य उद्देश कौशल्य विकास कार्यक्रम अधिक प्रभावी बनवणे आणि संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीला चालना देणे हा होता.

प्रमुख निर्णय आणि कृती योजना

१. समितीची कार्यक्षमता वाढवणे

सदस्यांची अंतिम यादी : IMC सदस्यांची यादी निश्चित करण्यात आली आहे. लवकरच प्रत्येक सदस्याच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या स्पष्ट करणारे पत्र संस्थेतर्फे जारी केली जाईल. ही यादी संस्थे मध्ये फलकावर प्रदर्शित केली जाईल.

 मासिक बैठकांचे वेळापत्रक : समितीच्या नियमित बैठका आता प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी किंवा शुक्रवारी होतील. सुट्टी असल्यास त्यापूर्वीच्या दिवशी बैठक घेतली जाईल. यामुळे कामामध्ये सातत्य राखणे सोपे होईल.

२. प्रशिक्षनार्थी आणि उद्योगांमधील दरी कमी करणे

 उद्योग तज्ञांचे मार्गदर्शन : प्रशिक्षनार्थींना उद्योगाची नेमकी गरज काय आहे हे समजावे यासाठी, उद्योग तज्ञांच्या नेतृत्वाखाली विशेष सत्रे आयोजित केली जातील. या सत्रांमध्ये करिअर मार्गदर्शन, रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये आणि उद्योजकतेवर भर दिला जाईल.

प्रशिक्षण आणि अभ्यासक्रमात सुधारणा : प्रशिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी निदेशकांसाठी 'प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण' (Training for Trainers) ही योजना सुरू केली जाईल. त्यामुळे निदेशकांना नवीनतम औद्योगिक मानकांची माहिती मिळेल. याशिवाय, प्रशिक्षनार्थींना प्रत्यक्ष कामाचा अनुभव देण्यासाठी 'नोकरीदरम्यान प्रशिक्षण' (On-the-Job Training - OJT) कार्यक्रम सुरू करण्यावरही चर्चा झाली.

३. संस्थेची ओळख वाढवणे

 प्रभावी प्रचार : संस्थेचा नावाचा प्रवेशद्वारावर मोठा आणि स्पष्ट दिसणारा फलक (बोर्ड) लावला जाईल. याव्यतिरिक्त, प्रशिक्षनार्थींच्या आणि संस्थेच्या यशाच्या कथा सोशल मीडिया, स्थानिक शाळा आणि विविध उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर केल्या जातील. यामुळे संस्थेची प्रतिमा अधिक मजबूत होईल.

आभार आणि पुढील वाटचाल

या बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी आणि उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी एक्साइड इंडस्ट्रीज लि., चिंचवडचे प्लांट एचआर श्री संतोष चव्हाण यांचे विशेष आभार मानण्यात आले. बैठकीला उपस्थित सर्व सदस्यांच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले.

प्राचार्य तथा सचिव IMC यांनी बैठकीत दिलेल्या सर्व सूचनांचे स्वागत केले आणि संस्थेच्या हितासाठी त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची आपली कटिबद्धता व्यक्त केली. हे सहकार्य प्रशिक्षनार्थींना उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली.

IMC मीटिंगमध्ये उपस्थित पदाधिकारी - 

उद्योग प्रतिनिधी: श्री राजेंद्र कांबळे (Senior General Manager, Grauer & Weil (India) ltd, Dhanore Alandi ), श्री संतोष चव्हाण (HR Plant Head, Exide Industries Ltd, Chinchwad), सौ. मयुरा कुंचे (HR Manager, Schamalz India Pvt Ltd, Bhosari), श्री कृष्णा खिलारे (Director, RSDO ऑटोमेशन अँड रोबोटिक्स Pvt Ltd, निघोजे चाकण), श्री धनंजय मोड (CEO, Addiddha Samagraa Solution, Pune)

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पिंपरी चिंचवड, पुणे प्रतिनिधी : श्री शशिकांत साबळे (प्राचार्य), श्री एस आर खुडे (क. प्र. सल्लागार), श्री प्रशांत गवारी (गट निदेशक), श्री सचिन पावडे (गट निदेशक), श्री चेडे एस. एस. (वरिष्ठ लिपिक)