पुणे : आयुध निर्माणी,देहूरोड (O.F.D.R) फॅक्टरीचे निगमीकरण करण्याचा तसेच भविष्यात होणाऱ्या कामगारांच्या हस्तांतरण च्या Option Form (सरकारी कर्मचारी/निगम कर्मचारी पर्याय प्रपत्र) चा विरोध करण्यासाठी आणि सेवानीवृत्तीपर्यंत सरकारी नोकर म्हणून अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी सर्व संघटना आणि असोसिएशन मिळून संयुक्त कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे.
यामध्ये मान्यता प्राप्त कर्मचारी महासंघ (फेडरेशन) आणि संरक्षण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांच्या संघटना आणि अधिकाऱ्यांच्या सर्व असोसिएशन (CDRA) यांच्याद्वारे दिलेल्या माहितीनुसार OFDR शाखेत OFWU (AIDEF), OFKU (INDWF), BSKS (BPMS), OFEU (NPDEF) यांसह अनेक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत..
संयुक्त कृती समितीने ओ.एफ.डी.आर कर्मचाऱ्यांच्या एकतेसाठी आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी व्यापक पातळीवर जनजागृती उपक्रम सुरू केले आहेत. 9 सप्टेंबर रोजी पॅम्प्लेट्स (पत्रक वितरण) वितरित करण्यात आले तर 10 सप्टेंबरला जाहीर सभा घेण्यात आली ज्याला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
● दि.11 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर 2025 दरम्यान हस्ताक्षर अभियान.
● कामगारांच्या हस्तांतरण च्या बाबतीत सरकारी कर्मचारी च राहणार असल्याचे पर्याय प्रपत्र भरून घेणे (Option Form)
● दि.1 ऑक्टोबर 2025 रोजी ‘निगमीकरण विरोधी दिवस’ करने.
याशिवाय,प्रसार भारती मॉडेल लागू करण्याच्या मागणीसाठी पुढील काळात एकदिवसीय संप आयोजित करण्याची तयारी सुरू असल्याचे समितीकडून इशारा देण्यात आला आहे. संयुक्त कृती समितीने सर्व कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमांत सक्रीय सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे.
