महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ अध्यक्षपदी (राज्यमंत्री दर्जा) श्री.गणेश ताठे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाची पुर्नरचना 

महाराष्ट्र शासनातर्फे किमान वेतन अधिनियम, १९४८ कलम ७, कलम ९ आणि महाराष्ट्र किमान वेतन नियम, १९६३ मधील कलम ४ च्या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाची पुर्नरचना करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी (राज्यमंत्री दर्जा) श्री.गणेश लक्ष्मणराव ताठे यांची नियुक्ती करण्यात आली.

     श्री.गणेश लक्ष्मणराव ताठे हे भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांनी सन १९९० पासून काम सुरू केलं, स्वतःच्या पक्षाचं सरकार नसताना देखील ज्यांनी मनस्वीपणे पक्षाचं नाव झेंडा वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचवलं. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील या सामान्य कार्यकर्त्याला स्वकर्तुत्वाने पक्षाने दोन वेळा भाजपा कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करायची संधी दिली. त्या संधीच सोनं केलं. सातत्याने लोकांच्या करिता, कामगारांकरिता शासन दरबारी पाठपुरावा केला. केंद्रीय कामगार कायद्यामध्ये कामगार हिताचे बदल करण्यात पुढाकार, कोविड काळात मृत्यू झालेल्या कामगारांच्या निराधार कुटुंबांना ज्यांनी योग्य न्याय मिळवून दिला.

महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाची शासन खालील प्रमाणे पुनर्रचना पुढील प्रमाणे :-

अध्यक्ष :- श्री. गणेश लक्ष्मणराव ताठे

सचिव :- सहायक कामगार आयुक्त (ग्रावि), मुंबई

मालक प्रतिनिधी -

श्री. श्रीकांत रामचंद्र देशमुख

श्री. बाबासाहेब चंद्रराव दरेकर

श्री. चंद्रकांत नारायणराव महाडिक

श्रीम. शुभांगी विनायक बुचडे

श्री. संतोष पंजाबराव देशमुख

कामगार प्रतिनिधी - 

श्री. बाळासाहेब तुकाराम भुजबळ

श्री. योगेश मधुकर आवळे

श्री. संजय सुरेश जोरले

ॲड. गणेश देशमुख

श्री. माणिक बाबुराव पाटील

स्वंतत्र  प्रतिनिधी -

श्री. गणेश लक्ष्मणराव ताठे

श्री. विरेंद्र ठाकर

श्री. सुबोध रविंद्र देऊळगांवकर

श्री. बिपीन नगीनदास गांधी

महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाची पुर्नरचना - शासन निर्णय पाहण्यासाठी क्लिक करा