कामगार कल्याण केंद्र चाकण आणि सी आय ई अँटोमोटिव्ह इंडिया लि. यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा

पुणे: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार कल्याण केंद्र चाकण, यांच्या वतीने सी आय ई अँटोमोटिव्ह इंडिया लि. भोसरी यांच्या सहकार्याने दिनांक 05/06/2025 रोजी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे राज्याचे कल्याण आयुक्त मा. श्री. रविराज इळवे साहेब मा.श्री.मनोज पाटील साहेब प्र.सहाय्यक कल्याण आयुक्त,पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली मु. पो.कोहिनकरवाडी ( राजगुरूनगर  ) ता. खेड जि. पुणे येथे भव्य असे वृक्षारोपण करण्यात आले.

     सदर कार्यक्रमा करीता प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री.पंढरीनाथ कोहिनकर लोकनियुक्त सरपंच तसेच मा.श्री. सिध्देश्वर खेडेकर साहेब एच आर साहेब तसेच मा. श्री. पुंडलिक देवन साहेब सुरक्षा विभाग प्रमुख मा. श्री गजानन बाभुळकर वृक्षमित्र, मा. सरपंच श्री.भरत उढाणे टेल्को कर्मचारी मा.श्री शंकर नानेकर गुणवंत कामगार यांच्या उपस्थित वृक्ष लागवड व संवर्धन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सी आय ई ऑटोमेटिव्ह इंडिया लिमिटेड एम पी डी भोसरी पुणे येथील कामगार संघटना प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर कळमकर, श्री. सुभाष जामदार, श्री. कृष्णदेव थोरात तसेच वेगवेगळ्या आस्थापनातील कामगार वर्ग यांच्या उपस्थितीमध्ये भव्य असा वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला सदर प्रसंगी विविध जातीची दुर्मिळ औषधी तसेच ग्रामपंचायतीला उत्पन्न देणारी उपयुक्त अश्या 100 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. 

     सदर कार्यक्रमासाठी श्री. रामदास सैंदाणे गुणवंत कामगार,श्री.नागेश दळवी, श्री. कमलेश गावडे, श्री सदाशिव आमराळे,श्री नवनाथ कोहिनकर, श्री अनिल आरुडे या कामगार कृती समिती सदस्यांचे तसेच श्री बाबाजी चव्हाण ग्रामविकास अधिकारी यांचे सहकार्य लाभले. चाकण कार्यालयाचे केंद्र संचालक श्री. अविनाश राऊत यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.