बेलोटा ॲग्रीसोल्युशन्स अँड टूल्स प्रायव्हेट लिमिटेड (Bellota Agrisolutions & Tools Private Limited) येथे वेतनवाढ करार संपन्न

सिन्नर : मुसळगाव एमआयडीसीतील बेलोटा ॲग्रीसोल्युशन्स अँड टूल्स प्रायव्हेट लिमिटेड (Bellota Agrisolutions & Tools Private Limited) या कंपनीत सिटू प्रणित नाशिक वर्कर्स युनियन पदाधिकारी व कंपनी व्यवस्थापन यांच्यात दि 8/05/2025 रोजी वेतन करारावर सह्या करण्यात आल्या.

     या करारानुसार सर्व कामगारांना चार वर्षासाठी रु.11,400/- (अकरा हजार चारशे रुपये) वेतन वाढ मिळणार आहे. त्याचबरोबर शासनाच्या परिपत्रकानुसार महागाई भत्ता मिळणार आहे. तसेच दोन रजाची वाढ करण्यात आली असून मेडिक्लेम इन्शुरन्स कुटुंबासाठी पाच लाख रुपये व अपघाती विमा दहा लाख रुपये करण्यात आला आहे. कामगारांना दरवर्षी एक महिन्याच्या पगारा इतका बोनस मिळणार आहे. त्याचबरोबर पंधरा वर्षे सेवा केलेल्या कामगारांना सर्विस अवार्ड, स्वेटर इत्यादी लाभ मिळणार आहेत. 

    सदर करारामुळे कामगारांचे आता वेतन 40,850/- ते 46,850/-  इतका होईल व करार संपताना 50,000/- पेक्षा जास्त होईल. कंपनीच्या आवारात करारावर सह्या करण्यात आला आहे. या वेळी कामगारांनी फटाके वाजवून व एकमेकांना पेढे भरवूनआनंद व्यक्त केला. 

     पगारवाढ व इतर लाभाच्या करारावर कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने श्री.प्रशांत जोशी प्लांट हेड, श्री.दत्ता जाधव, श्री.जितेंद्र राजपूत, श्री. प्रवीण बोडके यांनी व युनियनच्या वतीने सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉक्टर डी एल कराड, राज्य उपाध्यक्ष कॉ.सिताराम ठोंबरे, जनरल सेक्रेटरी कॉ.तुकाराम सोनजे,  सेक्रेटरी कॉ.संतोष कुलकर्णी, कॉ.हरिभाऊ तांबे, कमिटी मेंबर कॉ.विलास जाधव, कॉ.अजित लोखंडे, कॉ.भारत गोळेकर, कॉ.चंदर शितोळे, कॉ.योगेश गायकवाड, कॉ.सागर राजनोर, कॉ.तुकाराम कडबाने  यानी सह्या केल्या.