पुणे: तळेगाव एमआयडीसी येथील इमिटेक टेक्नॉलॉजीज इंडिया प्रा. लि. (Emitec Technologies India Pvt Ltd.) कंपनी व्यवस्थापन आणि इमिटेक एम्प्लॉईज कामगार संघटना यांच्यामध्ये चौथा वेतनवाढ करार दि.३१ मार्च २०२५ रोजी संपन्न झाला.
वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :
करार कालावधी : सदर करार हा माहे दि.१५ मे २०२४ ते दि.१४ मे २०२७ अशा तीन वर्षाकरिता करण्यात आला.
१) प्रथम वर्षासाठी - रुपये १४९५०/- (६५%)
२) द्वितीय वर्षासाठी - रुपये ४६००/- (२०%)
३) तृतीय वर्षासाठी - रुपये ३४५०/- (१५%)
फरकाची रक्कम १००% देण्याचे मान्य केले आहे.
मासिक हजेरी : जे कर्मचारी संपूर्ण महिन्यात कोणतेही रजा न घेता काम करतील त्यांना प्रोत्साहन म्हणून मासिक हजेरी बोनस म्हणून रुपये १५००/- दिला जाईल.
वैयक्तिक कर्ज सुविधा : रुपये २ लाख २४ महिन्यासाठी (२ कामगारांना) महिन्यातून देण्यात येतील व तसेच रुपये ५० हजार ही रक्कम महिन्यातून (पाच अर्ज) कामगारांना देण्यात येईल. रुपये २५ हजार मागील प्रथा चालू राहील.
रात्रपाळी भत्ता : नव्याने रात्रपाळी साठी रुपये ३५/- भत्ता चालू करण्यात आला.
वार्षिक स्नेहसंमेलन : सध्या अस्तित्वात असलेले वार्षिक स्नेहसंमेलन आहे तशीच प्रथा चालू ठेवण्यात आले आहे. व एक भेटवस्तू कामगारांना दिली जाईल.
वार्षिक सहल : सध्याच्या प्रथेनुसार सर्व कामगारांसाठी एक दिवसाची वार्षिक सहल आयोजन करण्यात येईल.
GPA पॉलिसी : रुपये ६ लाख देण्यात आली आहे.
मेडिक्लेम पॉलीसी : वर्ष २०२४ साठी - ३ लाख रुपये, वर्ष २०२५ साठी - ४.५० लाख रुपये, वर्ष २०२६ साठी - ५ लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे.
ग्रुप टर्म इन्शुरन्स : कर्मचाऱ्यांच्या मृत्यूच्या नंतर रुपये ३५ लाख ही रक्कम मान्य करण्यात आली.
मृत्यू साहाय्य योजना : मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना अंत्यसंस्कार व तस्यम खर्चासाठी रुपये १० हजार ची रक्कम परत न करण्यायोग्य मदतनिधी म्हणून दिली जाईल हा लाभ कर्मचाऱ्यांच्या (आई-वडील जोडीदार व मुले) यांचा समावेश असेल. व तसेच कामगाराला ५ दिवसाची पगारी सुट्टी देण्यात येईल.व तसेच कामगाराच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसास नोकरी देण्याचे मान्य केले आहे.
गणवेश व बूट : ४ शर्ट,३ पॅन्ट व शिलाई साठी रुपये २६०० मान्य केले. व तसेच २ वर्षातून एकदा स्वीट (शर्ट / हूडी) देण्याचे मान्य केले आहे.दरवर्षी एक सुरक्षा दिनाचा टी-शर्ट दिला जाईल. एक जोडी सेफ्टी शूज.३ वर्षातून कंपनीचा लोगो असलेली बॅग व टू इन वन जॅकेट देण्याचे मान्य केले आहे.
•सणासुदीच्या सुट्ट्यांमध्ये १ दिवसाने वाढ करण्यात आली आहे. अशा एकूण १२ सुट्ट्या देण्याचे मान्य केले आहे.
•विशेषधिकार रजा (PL - २) वाढ करण्यात आली आहे.
•पितृत्व रजा ५ दिवसाची मान्य करण्यात आली आहे. (दोन अपत्यासाठी)
•आपत्कालीन रजा (Short Leave) - महिन्यातून २ वेळेस (प्रत्येकी २ तास) च्या रजा मान्य करण्यात आले आहे.
* मतदानाची सुट्टी - सरकारी आदेशानुसार राहील.
•रजा बँक - रजेच्या बँकेची स्थापना करून दरवर्षी त्यात ०.५ रजा कामगारांच्या CL मधून वजा करून रजा बँक लिव्ह मध्ये अदा करण्यात येईल.
•रजा साठवणूक मर्यादा - ५० दिवसापर्यंत साठवण्याची तरतूद करण्यात आली.
पॉश कायदा व समिती : एक महिला कामगार यांना पॉश समितीचे प्रशिक्षण देऊन समितीमध्ये सामावून घेण्याचे मान्य केले आहे.
उपाहारगृह (कॅन्टीन) : रात्रपाळी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन वेळा दोन अंडी किंवा दूध एक दिवसाआड पुरवले जाईल. व तसेच उन्हाळ्याच्या दुपारच्या जेवणामध्ये एक वाटी दही किंवा ताक दिले जाईल. व चहाच्या वेळेमध्ये कर्मचाऱ्यांना बिस्किट देण्याचे मान्य केले आहे.
सुकन्या योजना : कर्मचाऱ्यांना मुलगी अपत्य जन्मास आल्यानंतर (२ अपत्य पर्यंत) भेटवस्तू म्हणून रुपये १० हजार देण्यास मान्य केले आहे.
विवाह भेट : मागील प्रथा विवाह भेटवस्तू ही रद्द करण्यात आली आहे.
रविवार कामकाज (Sunday Working Allowance) : सध्याचा रुपये ३००/- चा रविवार कामकाज भत्ता रुपये २००/- अतिरिक्त रकमेसह वाढ करून , ज्यामुळे एकूण रविवार कामकाजाचा भत्ता रुपये ५००/- देण्याचे मान्य केले आहे. सर्व कर्मचाऱ्यांना रविवार च्या कामासाठी शिफ्ट रोटेशन पद्धतीने रविवार साठी काम लावण्यात येईल असे मान्य करण्यात आले आहे.
वार्षिक वैद्यकीय तपासणी : वर्षातून एकदा प्रतिष्ठित रुग्णालयात वार्षिक वैद्यकीय तपासणी करण्याचे मान्य केले आहे.
सेवा पुरस्कार : ५ वर्ष सेवेसाठी - रुपये ५,०००/-, १० वर्ष सेवेसाठी - रुपये ९,०००/- ,१५ वर्ष सेवेसाठी - रुपये १५,०००/-, २० वर्ष सेवेसाठी - रुपये १७,५००/- पुरस्कार म्हणून देण्याचे मान्य केले आहे.
ब्लॉक क्लोजर : बंद किंवा उत्पादन कपाती च्या परिस्थितित, कामगार जास्तीत ज्यास्त ३ दिवसाच्या सुट्या चा भार उचलतील असे मान्य करण्यात आले.
मागील सेवा सुविधा जसेच्या तसे पुढे सुरू राहणार आहेत.
करारावरती व्यवस्थापनाच्या वतीने श्री. आशिष भल्ला (Managing Director & CEO), श्री. मनोज मुंजाळ (Managing Director & CFO), श्री. रणजीत कन्ना (Operation Head), सौ. पूनम पाठक (HR Head), श्री. स्वप्निल महामुनी (Deputy Manager IR) तसेच संघटनेच्या वतीने श्री. भगवान तांबे - अध्यक्ष, श्री. तानाजी कडलगेकर - उपाध्यक्ष, श्री. लालासाहेब जंजीरे - सेक्रेटरी, श्री. सोमनाथ अलभर - खजिनदार ,श्री. मयूर रायते - सदस्य, श्री. अभिजीत नाईकवाडे - सदस्य, श्री. युवराज कोठारे - सदस्य यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
वेतन वाढ करार हा मे. इमिटेक टेक्नॉलॉजीज इंडिया प्रा. लि. व मे. इमिटेक एम्प्लॉईज युनियन संघटनेच्या पदाधिकारी यांच्या संघटनेच्या सभासदांना असणारा अभूतपूर्व विश्वास व संघ हितासाठी असणारी तयारी व कंपनीचा कामगारांच्या कौशल्य, गुणवत्ता, सुरक्षा ,शिस्त यावर पूर्ण विश्वास यामुळे करार यशस्वीरित्या पूर्ण झाला.
वेतनवाढ करार यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापनातील सर्व अधिकारी, पदाधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच सदरच्या करार संपन्न होण्याकरिता कामगारांनी सहकार्य केल्याबद्दल संघटनेच्या वतीने मनापासून धन्यवाद व अभिनंदन करण्यात आले. कामगारांनी डीजेच्या तालावर नाचून व फटाक्याची अतिषबाजी करून ह्या अद्भुत वेतनकराराचा आनंद व्यक्त केला.