मुंबई : शहरांच्या विकासात ग्राहक प्रथम या दृष्टिकोनासाठी ओळखल्या जाणाऱ्या रुस्तमजी ग्रुपने ठाण्यातील रुस्तमजी अर्बनियाच्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी कामगार गृहनिर्माण सुविधा सुरू केली आहे असे वृत्त हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेने दिले आहे.
भारतीय रिअल इस्टेट उद्योगातील हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. 35,000 चौरस फूट क्षेत्रफळावर उभारण्यात आलेल्या या गृहनिर्माण प्रकल्पात 84 हवेशीर खोल्या आहेत. एकूण 500 कामगारांची सोय येथे करण्यात येणार आहे. 10 फूट बाय 10 फूट आकाराची एक खोली असून त्यात सहा व्यक्तींची राहण्याची सोय आहे.
केवळ पायाभूत सुविधाच नव्हे तर समुदायाची काळजी करण्याची रूस्तमजीच्या संस्कृतीचा हेतू हा उपक्रम प्रतिबिंबित करतो. कामगारांसाठी जी सोय करण्यात आली आहे ती केवळ निवास व्यवस्था नाही तर एक पोषक परिसंस्था आहे जी सर्वांसाठी घरे बांधणाऱ्यांना परत देण्याच्या समूहाच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते. तसेच केवळ चांगली घरेच नाही तर चांगले आयुष्य देण्याच्या त्यांच्या चिरस्थायी विश्वासाला बळकटी देते.
या लाँचबद्दल बोलताना, रुस्तमजी ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. बोमन रुस्तम इराणी म्हणाले, "ज्या माणसांमुळे आमची शहरे उभी राहतात, ती निर्माण करणारे लोक शहरांच्या हृदयातच असण्यास पात्र आहेत. अर्बनिया येथे आमचे नवीन विकसित कामगार निवासस्थान त्या विश्वासाचेच प्रतिबिंब आहे. केवळ गृहनिर्माण नव्हे तर एक उत्तम आणि सर्वसमावेशक राहणीमान म्हणून हे डिझाइन केले आहे. हा उपक्रम रिअल इस्टेट उद्योगात कामगार कल्याणाचा दर्जा उंचावण्याच्या आमच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाला बळकटी देतो. आम्हाला आशा आहे की, हा प्रकल्प एक बेंचमार्क सेट करेल. जे आमच्या प्रकल्पांमध्ये हळूहळू स्वीकारले जाऊ शकते आणि अधिक समावेशक तसेच जबाबदार विकासासाठी व्यापक बदलासाठी प्रेरणा देईल."
या कामगार गृहनिर्माणात पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांचा समावेश आहे, ज्यामध्ये फ्लशिंग आणि लँडस्केपिंगसाठी पाण्याचा पुनर्वापर करणारे 40 केएलडी सीवेज ट्रीटमेंट प्लांट (एसटीपी) आणि स्वयंपाकघरातील कचऱ्याचे साइटवरच व्यवस्थापन करण्यासाठी 200 किलो ऑरगॅनिक वेस्ट कंपोस्टरची (ओडब्ल्यूसी) व्यवस्था करण्यात आली आहे. गॅस बँक आणि स्वयंपाकघर सारख्या महत्त्वाच्या भागात 13-यार्ड हायड्रंट्स, 900 एलपीएम फायर पंप आणि स्प्रिंकलरसह एक व्यापक अग्निसुरक्षा नेटवर्क 24 तास सुरक्षितता सुनिश्चित करते. कार्यक्षम झोपड्या: पीयूएफ पॅनल्ससह बांधलेले कामगार निवासस्थान, घरातील तापमान थंड राखण्यासाठी थर्मल इन्सुलेशनची सोय करते.
या लाँचबद्दल बोलताना, कपस्टोन कन्स्ट्रक्शन्स (रुस्तमजी ग्रुप कंपनी) चे सीईओ श्री. अनुपम वर्मा म्हणाले, कामगारांसाठी घरे ही सामान्यतः केवळ आवश्यकता म्हणून पाहिली जातात. रुस्तमजी येथे, आम्ही ती पुन्हा परिभाषित केली आहेत. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी ज्या पद्धतीने घरे तयार करतो, अगदी त्याच अचूकतेने आणि काळजीने या गृहनिर्माण प्रकल्पाचे देखील डिझाइन केले आहे. सुरक्षा प्रणालीपासून ते स्वच्छता आणि मनोरंजनापर्यंत - प्रत्येक तपशील ध्यानात घेतला आहे. जेणेकरून आमच्या कामगारांची काळजी शहरी टाउनशिपमधीलचा इतर रहिवाशांप्रमाणे घेतली जाईल.
चांगल्या प्रकारे डिझाइन केलेली राहण्याची जागा, स्वच्छ स्वयंपाकघर (गॅस-सक्षम) आणि जेवणाच्या सुविधांपर्यंत, प्रत्येक गोष्टीचे येथे काळजीपूर्वक नियोजन केले आहे. या सुविधेत 29 शौचालये, 9 युरिनल्स आणि 15 स्वच्छ प्रसाधनगृहांचा समावेश आहे. एक यूव्ही-आधारित पाणी शुद्धीकरण प्रणाली सुरक्षित पिण्याचे पाणी प्रदान करते, तर एक पूर्णपणे सुसज्ज कॅन्टीन - 42 डबल-बर्नर गॅस स्टोव्हद्वारे चालवले जाते. यात एका वेळी 280 कामगारांना सेवा देता येणे शक्य आहे.
आवश्यक गोष्टींव्यतिरिक्त येथे मनोरंजनाला देखील प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळेच येथे एक ओपन जिम, स्पोर्ट्स झोन, आफ्टरआवर्स फुरसतीसाठी प्रोजेक्टर रूम, पूर्णवेळ डॉक्टरांची सोय, मॅटर्निटी रूम, सलून, पाळणाघर, रिटेल आउटलेट्स आणि एक मनोरंजन कक्ष या सगळ्याची सोय करण्यात आली आहे. यामागे कामगारांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेण्याचाच उद्देश आहे.
इतर रुस्तमजी प्रकल्पांमध्येही अशाच प्रकारचे मॉडेल्स राबविण्याच्या योजना आधीच सुरू झाल्या आहेत, ज्यामुळे समूहाच्या समग्र, एकात्मिक विकासाच्या दृष्टिकोनाला बळकटी मिळते. या सगळ्यात प्रत्येक टप्प्यावर कामगारांना प्राधान्य असेल.