पुणे : येथील मे.रिंगफेडर पॉवर ट्रान्समिशन (Ringfeder Power Transmission) या जर्मन कंपनीने गेल्या वर्षी टेक ओव्हर केलेल्या मे.राठी ट्रान्सपॉवर प्रा.लिमीटेड, मरकळ, पुणे मध्ये कंपनी व्यवस्थापन व पुणे मजूर संघटना यांच्यामध्ये दि.२७/०३/२०२५ रोजी वेतनवाढीचा करार शांततामय, उत्साही आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.
वेतन कराराची ठळक वैशिष्टे :
करार कालावधी : दि. ०१/०४/२०२५ ते ३१/०३/२०२८
पगारवाढ : रुपये १७,५००/- करण्यात आली. सदर वाढ तीन वर्षांमध्ये समान दिली जाईल.
बिन व्याजी कर्ज : घरासाठी रु.१,५०,०००/-, मुला-मुलींच्या शिक्षणासाठी रु.१,००,०००/- तसेच जटिल व मोठ्या आजारासाठी रु.१,००,०००/-
बोनस : पहिल्या वर्षासाठी रु.१८,०००/-, दुसऱ्या वर्षी - रु.१८,२००/-, तिसऱ्या वर्षी - रु.१८,४००/-
ऍक्सीडेन्टल पॉलिसी : रु.३,००,०००/-
मेडीक्लेम पॉलिसी : पहिल्या वर्षी - रु.१,००,०००/-, दुसऱ्या वर्षी - रु.१,५०,०००/-, तिसऱ्या वर्षी - रु.२,००,०००/-
कॅन्टीन सुविधा : चहा मोफत, नाष्टा व जेवण कामगारांचा हिस्सा - ३५%, व्यवस्थापनाचा हिस्सा - ६५%
रजा : रजा तीन वर्षापर्यंत साठवता येतील व त्याचे रोखीने पैसे दिले जातील.
व्यवस्थापनाच्या वतीने मे.रिंगफेडर पॉवर ट्रान्समिशन व मे.राठी ट्रान्सपॉवर प्रा.लिमीटेड व्यवस्थापकीय संचालक श्री दिपन रामालिंगम व उत्पादन व्हाईस प्रेसिडेंट श्री मयुरेश कुलकर्णी व जनरल मॅनेजर (मनुष्यबळ व औद्योगिक संबंध) श्री महेंद्र फणसे व संघटनेच्या वतीने जनरल सेक्रेट श्री रामचंद्र बी शरमाळे, सेक्रेटरी श्री विवेक कांबळे, युनिट प्रतिनिधी माणिक पडवळ, श्री राजेंद्र बुरडे, श्री सोमनाथ कदम, श्री संदीप आटळकर, श्री अनिल राठोडे, श्री बापूसाहेब दौंडकर, श्री नंदकिशोर तेलंगे यांनी सह्या केल्या या करारामुळे कामगारांमध्ये अत्यंत उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरलेले आहे.