मुंबई : गेली अनेक वर्षे देशातील कामगारांवर येणारी बेकारीची मोठी समस्या आणि त्याचबरोबर कंत्राटीकरण, आऊटसोर्सिंगने हैदोस घातलेला असतानाच भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने कोणताही अनपेक्षित संघर्ष न करता कामगार नेते आमदार भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप आणि महासंघाचे रायगड जिल्हा सचिव व मे. थरमॅक्स लिमिटेडमधील खोपोली युनिट अध्यक्ष राजेश पाटील यांच्या सहयोगाने मे. थरमॅक्स लिमिटेडमधील १०० कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा करार केलेला आहे.
याआधी या कंत्राटी कामगारांना दोनवेळा वेतनवाढसुद्धा मिळवून दिलेली आहे. भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने कायदेशीर प्रक्रियेने महासंघाचे सरचिटणीस आमदार भाई जगताप आणि अध्यक्ष दिलीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली मिळालेले यश हे प्रेरणादायी व अनुकरणीय असेच आहे. १०० कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा मोठा ऐतिहासिक करार केला. युनियन व व्यवस्थापन यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे तणावाचे वातावरण निर्माण झाले नाही, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.