पुणे : पुण्यातील टिपटॉप इंटरनॅशनल हॉटेलमध्ये 'सक्षम भारत २०२५' शिखर परिषद उत्साहात आणि दिमाखात आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये देशभरातील विविध उद्योगांमधील प्रमुख व्यक्तींनी आपले अमूल्य विचार मांडले. ही पहिली परिषद असली तरी, चर्चेसाठी निवडलेले विषय, नामांकित वक्ते, आणि चर्चेची उच्चस्तरीय श्रेणी यामुळे ही परिषद ऐतिहासिक ठरली.
डॉ. अर्जुन देवरे, रिजनल पासपोर्ट ऑफिसर -पुणे (आयएफएस)-(परिषदेचे प्रमुख पाहुणे)
श्री. अभय गिते, अप्पर कामगार आयुक्त पुणे विभाग
श्री. ऋजुता जगताप, कार्यकारी संचालक, साज टेस्ट प्लांट
श्री. शैलेंद्र अभ्यंकर, संस्थापक, फिनसॉफ्ट एआय
यावेळी बोलताना डॉ अर्जुन देवरे बोलले कि टीममध्ये विश्वास निर्माण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. उत्तम काम करण्यासाठी टीमसाठी एक आदर्श व्यक्ती बनणे आवश्यक आहे. आपल्या कामातून यश मिळवण्यासाठी, आपल्याला सर्वांचा, विशेषत: वरिष्ठांचा विश्वास मिळवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लोकांच्या तक्रारी आणि अडचणी समजून घेतल्या जाणे, हे चांगले काम करण्यासाठी अनिवार्य आहे.आपण ट्रान्सफॉर्मेशनच्या टप्प्यात आहोत आणि शासकीय कार्यालयात कॉर्पोरेट संस्कृतीचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे, त्याची सुरवात आम्ही आमच्या कार्यालयातून केली आहे .
यावेळी बोलताना श्री अभय गीते बोलले कि भारत सक्षम आहे, हे कोरोना महामारीच्या वेळी सिद्ध झाले. इतर राज्यांतील असंघटित कामगारांना प्रत्येक वेळी मोठ्या प्रमाणात साहाय्य मिळाले, भारतीय संस्कृती सकारात्मक आहे आणि ती विकास आणि वृद्धीसाठी उपयुक्त आहे. आपल्याला भारताला प्रबळ करण्यासाठी याचा उपयोग करावा लागेल. सरकार उद्योगाच्या फायद्यासाठी शेकडो सुधारणा आणि चांगली धोरणे राबवत आहे. आता उद्योगाने या धोरणांचा लाभ घेणे आवश्यक आहे. या परिषदेची थीम उत्कृष्ट आहे आणि HR व्यावसायिकांनी स्वतःला विकासासाठी तयार करणे आवश्यक आहे. भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार आहे, ज्यामुळे अनेक आव्हानं आणि संधी येतील. त्यासाठी तयार राहा.
या परिषदेच्या आयोजनासाठी आणि प्रभावी पॅनेल चर्चांसाठी श्री. सरफराज मणेर, श्री. श्रीकृष्ण गंधे, श्री. अजित देसवंडीकर, श्री. नवनाथ सूर्यवंशी , श्री. राहुल निंबाळकर , श्री. रमेश बागल , श्री.मधुकर सूर्यवंशी, श्री. प्रदीप मानेकर ,श्री. किशोर शिंदे आणि श्री. टिकमसिंग शेखावत यांनी परिश्रम घेतले. यादरम्यान श्रीयुत सरफराज मनेर श्रीकृष्ण गंदे तसेच एन आय पी एम पुणे चाप्टर चे चेअरमन श्री कल्याण पवार यांनी सर्व उपस्थित ना मार्गदर्शन केले व सक्षम भारत बनविण्याकरता आवाहन केले.
या एकदिवसीय परिषदेत विविध विषयांवरील चर्चांमध्ये खालील वक्त्यांनी आपले विचार मांडले:
पॅनेल सदस्य:
श्री. आलोक झा, ग्लोबल सीईओ, आयपीएस ग्रुप
श्री. शैलेंद्र अभ्यंकर, संस्थापक, फिनसॉफ्टएआय
श्री. श्रीधर शुक्ला, अध्यक्ष, के-पॉइंट
श्री. संजय क्षिरसागर, प्लांट हेड, महिंद्रा
श्रीमती. रुजुता जगताप, माजी संचालक, साज टेस्ट प्लांट
पॅनेल सदस्य:
श्री. श्रीकांत सारडा, एमडी, एसेंचर
डॉ. अनिल जाधव, जॉईंट डायरेक्टर , डीव्हीईटी
श्री. अनु सेठी, संचालक एचआर, एफईव्ही इंडिया
श्री. विनोद बिडवाईक, सीएचआरओ, सकाळ मिडिया ग्रुप
पॅनेल सदस्य:
श्री. विक्रम म्हस्के, सीएचआरओ, केएसपीजी
श्री. समीर गाडगीळ, उपाध्यक्ष एच आर, विप्रो
श्रीमती कविता कालीकर, प्लांट एच आर हेड, जॉन डीअर
श्री. ल्युकाडिया मिली संदीप-ग्रुप सीएचआरओ, पॉशिस मेटल्स
श्री. शेखर कांबळे, रिजिनल एच आर हेड, टीसीएस
पॅनेलचे सदस्य:
श्री. राहुल बागले, उपाध्यक्ष मानव संसाधन, अल्ट्रा कॉर्पोटेक
श्री. भाई जगताप, वरिष्ठ कामगार नेते व आमदार विधान परिषद
अॅड. आदित्य जोशी, एम्प्लॉयमेंट लॉयर
श्री. सचिन आहेर, वरिष्ठ कामगार नेते व आमदार विधान परिषद
श्री. संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष मानव संसाधन, महिंद्रा
अॅड. नवराज जलोटा, एम्प्लॉयमेंट लॉयर, हाय कोर्ट
यामध्ये एन.एच.आर.डी., एन.आय.पी.एम, एम.सी.सी. आय., एफ. टी. पी. ओ., सी. आय.आय., एच.आर.आय. आय.,मास यांसारख्या विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्तिथी लाभली.
सक्षम भारत शिखर परिषद २०२५ ने भारतातील शिखर परिषदांसाठी नवीन मानक स्थापित करत सर्वसमावेशक नेतृत्व, नाविन्य आणि सातत्यपूर्ण विकासाला प्रोत्साहन देत भारताच्या जागतिक महाशक्ती म्हणून उदयाच्या मार्गाला गती दिली आहे.
सक्षम भारत शिखर परिषद २०२५ ने भारतातील शिखर परिषदांसाठी नवीन मानक स्थापित करत सर्वसमावेशक नेतृत्व, नाविन्य आणि सातत्यपूर्ण विकासाला प्रोत्साहन देत भारत एक जागतिक महाशक्ती म्हणून उदयास येण्यास गती दिली आहे.
या कार्यक्रमासाठी श्री निखिल वाळके सहायक आयुक्त आणि चेअरमन माथाडी बोर्ड, उपाध्यक्ष एन्ड्युरन्स ग्रुप, डॉ झोपे,ऍड. प्रशांत क्षिरसागर, श्री अमन राजाबली, श्री धैर्यशील भोसले, श्री. अमोघ सोमण, श्री उदयसिंह खरात, श्री अभिजीत पवार, श्री श्रेयस आचार्य, श्री विनायक पाटील, श्री महेंद्र फणसे, श्री महेश करंदीकर यांची उपस्थिती लाभली. श्रीमती वहिदा पठाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि श्री. नवनाथ सूर्यवंशी यांनी आभार प्रदर्शन केले.