ईपीएफओ (एम्प्लॉईज प्रॉविडंट फंड ऑर्गनायझेशन) ने खातेदारांसाठी एक दिलासादायक अपडेट जारी केली आहे. संघटित क्षेत्रातील खासगी कंपन्यांमध्ये नोकरी करणारे कर्मचारी बर्याचदा त्यांच्या नोकऱ्या बदलतात. यामुळे त्यांचे यूएएन क्रमांक असलेल्या खात्यांमध्ये कंपनीनिहाय खाते क्रमांक तयार होतात.
आता, जर कोणाच्या यूएएन क्रमांकास आधार क्रमांक जोडलेला असेल, तर त्यांच्यासाठी एक नवी सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार, कर्मचाऱ्यांना नोकरी बदलली तरी, जुन्या किंवा नव्या एम्प्लॉयरची मंजुरी न घेता प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करता येईल.
पत्रक जारी
ईपीएफओने 15 जानेवारी 2025 रोजी यासंदर्भातील एक पत्रक जारी केले आहे, ज्यात नोकरी सोडल्यानंतर पीएफ ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आलेली आहे. आता, ज्या कर्मचाऱ्यांना 1 ऑक्टोबर 2017 नंतर यूएएन क्रमांक जारी करण्यात आले आहेत आणि ते आधार लिंक्ड आहेत, त्यांना त्यांच्यावरील मेंबर आयडीवर प्रॉव्हिडंट फंड रक्कम ट्रान्सफर करता येईल.
जर एखाद्या कर्मचाऱ्याला 1 ऑक्टोबर 2017 नंतर दोन यूएएन क्रमांक मिळाले असतील आणि ते आधार क्रमांकाशी लिंक असतील, तर त्याच्या प्रॉव्हिडंट फंडची रक्कम ट्रान्सफर करता येईल.