छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा,छत्रपती संभाजी नगर येथील जॉलीबोर्ड लिमिटेड (Jollyboard Limited) कंपनी व्यवस्थापन व छत्रपती संभाजीनगर मजदूर युनियन सीटू यांच्या मधे कामगारांच्या मागणी संदर्भात सकारात्मक चर्चा होउन 7000 रुपये पगार वाढ करण्यात आली आहे ,बेसीकमधे 50% व इतर भत्यात 50% डायरेक्ट वन टाइम वाढ करण्यात आली आहे.
हा करार तीन वर्षासाठी करण्यात आला आहे, बदलता महागाई भत्ता ओपन ठेवण्यात आला आहे, मागील महिन्याचा फरक म्हणून 32 हजार देण्याचे ठरवण्यात आले आहे, एलटीए साठी 18000 हजार रुपये, तसेच दोन लिव्ह वाढ करण्यात आली आहे मागील सर्व सेवा शर्ती पुढेही चालू राहतील असे मान्य करण्यात आले आहे.
या करारावर कंपनीचे डायरेक्टर श्री अनिल शिंदे, कमर्शियल मँनेजर श्री के आर गोरे, प्रोजेक्ट मँनेजर श्री एम डी देसाई, युनियन तर्फे राज्य पदाधिकारी व युनियनचे अध्यक्ष जेष्ठ कामगार नेते कॉम्रेड लक्ष्मण साक्रुडकर, जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड दिपक आहिरे, कॉम्रेड भाऊसाहेब सुर्यवंशी, कॉम्रेड राजु कुट्टी, कॉम्रेड एन जी हनुमंते यांनी या करारावर स्वाक्षरी केल्या आहेत कामगारांनी या कराराचे स्वागत पेढे वाटुन केले.