उरण : समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेचा उरण येथे पोलारिस लॉजिस्टिक्स पार्क कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या बिपिन मरीन या सर्व्हेअर कंपनीसोबत करार करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष अतुल भगत यांनी या करारावर स्वाक्षरी केली. तसेच, बिपिन मरीनतर्फे भूषण हांडे यांनी स्वाक्षरी केली असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.
केंद्रीय कामगार कायद्याप्रमाणे वेतन तसेच, कामगारांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी चांगली वैद्यकीय सुविधा या प्रमुख मागण्या आम्ही या करारामध्ये कंपनीकडून मागून घेण्यात यशस्वी झालो आहोत. या करारानुसार तीन वर्षासाठी भरघोस वेतन वाढ तसेच प्रत्येक कामगारांना वैद्यकीय मदत म्हणून ५०००, ५५००, ६००० रुपये असे पुढील तीन वर्षांत मिळणार आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अतुल भगत यांनी दिली.
याप्रसंगी पोलारिस लॉजिस्टिक्स पार्क कंपनी प्रशासनातर्फे अरुप घोष, सागर म्हात्रे आदी उपस्थित होते. तसेच कामगार संघटनेतर्फे अजय पाटील, नैनेश म्हात्रे, कामगार प्रतिनिधी म्हणून राकेश भोईर, तुषार पाटील, शक्ती भोईर, नीलेश मोडखळकर, लकेश ठाकूर, विशाल ठाकूर, अभिजीत घरत, सुलक्षण ठाकूर तसेच बिपिन मरीन सर्व्हिसेसतर्फे भूषण हांडे, अक्षय ठाकूर उपस्थित होते.