रांजणगाव : येथील औद्योगिक नगरीतील ग्रुपो ॲन्टोलीन इंडिया प्रा.लि.(Grupo Antolin India Pvt Ltd) व ग्रुपो ॲन्टोलीन पुणे कामगार संघटना यांच्यामध्ये वेतन वाढीचा करार शांततामय, उत्साही आणि आनंदी वातावरणात वार गुरुवार दि.29 ऑक्टोबर 2024 रोजी संपन्न झाला.
सदर वेतनवाढ करार हा ग्रुपो ॲन्टोलीन पुणे कामगार संघटनेचे पदाधिकारी यांच्यावर संघटनेच्या सभासदांचा असणारा अभूतपूर्व विश्वास व संघहितासाठी काहीही करण्याची तयारी व कंपनीचा कामगारांच्या कौशल्य, गुणवत्ता,सुरक्षा, शिस्त यावर पूर्ण विश्वास यामुळे करार यशस्वीरित्या पूर्ण झाला.
वेतनवाढ करारातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे :
करार कालावधी : सदर करार हा माहे १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२६ अशा तीन वर्षाकरिता करण्यात आला.
कराराचे तिन वर्षासाठी लागू असणारे टप्पे खालीलप्रमाणे.
1) प्रथम वर्षासाठी रक्कम - रु. 7050 /-
2) द्वितीय वर्षासाठी रक्कम - रु. 7000 /-
3) तृतीय वर्षासाठी रक्कम - रु. 5500/-
फरक रक्कम : 100% फरक रक्कम देण्याचे मान्य करण्यात आले आहे
दिवाळी भेटवस्तू : एक चांगल्या पद्धतीची भेटवस्तू देण्यात येईल .
पहिले वर्ष - 41000
दुसरे वर्ष - 44000
तिसरे वर्ष - 47000
तसेच रुपये 1500/- किमतीचे ड्रायफूटस प्रत्येक दिवाळीला देण्यात येईल.
पे हॉलिडे : पे हॉलिडे मध्ये एक ने वाढ करण्यात आली. (एकुण = 9)
ब्लॉक क्लोजर मध्ये मर्यादा आणण्यात आलेली आहे की, ज्यामध्ये 1 ते 12 ब्लॉक क्लोजर साठी 50:50 टक्के 12 ते 30 ब्लॉक क्लोजर साठी 80:20 टक्के लिव्ह चे योगदान असेल आणि 30 ब्लॉक क्लोजर नंतर 100% पगार मिळणार आहे.
नाईट शिफ्ट आलाउन्स सुरू करण्यात आलेला आहे.(रु. 20/- रु प्रती दिन)
पगार ॲडव्हान्स : पगार ॲडव्हान्स रु. 30 हजारवरून रु. 50 हजार करण्यात आलेला आहे.
निवडणूक सुट्टी : विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी जीआर प्रमाणे सुट्टी देण्याचे मान्य झाले आहे.
मागील सेवा सुविधा जसेच्या तसे पुढे सुरू राहणार आहेत.
सर्व कामगारांना सेवा बक्षीस नव्याने चालू करण्यात आले आहे.
20 वर्ष सर्विस - रु. 15000/-
25 वर्ष सर्विस - रु. 25000/-
रजा : स्पेशल लिव्ह 2
लिव्ह बँक : लिव्ह बँक अधिक सुलभ करण्यात आली आहे.
पावसाळी रेनकोट : प्रत्येक वर्षाला एक पावसाळी रेनकोट देण्याचे मान्य करण्यात आलेले आहे.
मेडिक्लेम पॉलिसी रु. 2 .25 लाख रुपये राहील. (स्वतः कामगार, आई वडील, पत्नी , मुले)
दरवर्षी आई वडिलांच्या बाबत वाढणारा प्रिमियम कायमस्वरूपी बंद करण्यात आलेला आहे.
मेडिक्लेम बफर : मेडिक्लेम बफर रु.10 लाखावरून रु.15 लाख करण्यात आलेला आहे, व त्यापेक्षा जास्त अमाऊंट लागली तर आणखी रु.5 लाख करण्यात येईल.
मरणोत्तर विमा धोरण : रु.30 लाखावरून 35 लाख करण्यात आला आहे.
सदर करार यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले, उपाध्यक्ष राजू अण्णा दरेकर तसेच संघाचे प्रतिनिधी यांचे सहकार्य व मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले. तसेच आदर्श सरपंच सुनिल सात्रस यांचे मोलाचे सहकार्य लाभले. युनियन कमिटी मेंबर यांनी सुद्धा चांगले अथक प्रयत्न आणि मार्गदर्शन केले.
सदर करारवेळी व्यवस्थापनाच्या वतीने कृष्णन रामसुंदरम् (Product System Head), जॉईस सॅम्युअल (India Hrbp Director), दत्तात्रय बहिरट (Plant Director.), वैभव राऊत (AGM Production), वैभव पाथरकर (Manager HR), सुनिल नासरे (AGM-Maintenance), हरीगोपाल व्हेगंरी (AGM-Quality), जितेंद्र काकडे (Sr.Manager-Engineering), दत्तात्रय वाघमारे (Manager - Logistics), मनोज पाटील (Manager-Finance) तसेच संघटनेच्या वतीने अध्यक्ष दत्तात्रय ज्ञानदेव सात्रस, जनरल सेक्रेटरी दत्तात्रय मारुती गायकवाड, उपाध्यक्ष मनोज अरुण विश्वासराव, उपाध्यक्ष सतीश राजाराम घुगे, खजिनदार बापू काळूराम कड, सह.सेक्रेटरी केतन सराळकर, सह.सेक्रेटरी उस्मान दौलत सय्यद, कमेटी मेंबर गुलाब सखाराम दानवले (गुरुजी), सतिश होगे यांनी काम पाहिले.