१३० पेक्षा जास्त नामांकित कंपनी चा सहभाग - पदमभूषण स्वर्गीय रतन टाटा यांना सर्व एचआर प्रतिनिधींनी वाहिली श्रद्धांजली
पिंपरी चिंचवड : शुक्रवार दिनांक १८ ओक्टोम्बर २०२४ रोजी बोर्ड ऑफ़ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग (वेस्टर्न रिजन), मुंबई (BOAT) व सेंचुरियन यूनिवर्सिटी- ग्रामतरंग यांच्या संयुक्त विद्यमानाने आकुर्डी मध्ये मनुष्यबळ विभागात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांशी राष्ट्रीय प्रशिक्षुता प्रशिक्षण योजना (NATS) या विषयवार चर्चासत्र सिझन बॅंकेट्स, आकुर्डी या ठिकाणी पार पडली .
या कार्यक्रमाचे प्रमुख मा. श्री एन एन वडोदे यांनी बोर्ड ऑफ़ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग (BOAT) याच्या तर्फे वेस्टर्न रिजन मध्ये चालवण्यात येणाऱ्या NATS या भारत सरकार च्या योजने बद्दल मार्गदर्शन केले . हि योजना चालवत असताना एचआर टीम ला येणाऱ्या अडचणी बद्दल चर्चा करण्यात आली . प्रामुख्याने रेजिस्ट्रैशन करताना येणाऱ्या अडचणी , रीअंबरसमेंट मिळवताना येणारे प्रॉब्लेम , NATS ट्रेनिंग चा कालावधी अश्या अनेक अडचणी वर चर्चा झाली. श्री एन एन वडोदे यांनी प्रश्नोत्तर सेशन दरम्यान सर्व अडचणी व शंकाचे निरसन केले.
सेंचुरियन यूनिवर्सिटी - ग्रामतरंग जनरल मॅनेजर मा श्री रमेश रासकर यांनी उपस्थितीचे स्वागत केले , मा श्री विवेक सिनारे यांनी सेंचुरियन यूनिवर्सिटी - ग्रामतरंग याविषयी उपस्थित सर्व एचआर ला माहिती दिली . एनआयपीएमच्या - पिंपरी चिंचवड चाकण चाप्टर चेअरमन मा श्री नवनाथ सूर्यवंशी व फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्री चे सचिव मा श्री दिलीप बटवाल कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते . या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख अथिति म्हणून अल्ट्रा कार्पोटेक चे जनरल मॅनेजर एच.आर. & ऐड्मिन मा .श्री यशवंत पाटील, आईएफबी चे हेड एच.आर., ऐड्मिन & सेफ्टी मा श्री .काशीराम मेस्त्री , लुकास टी . व्ही ,एस .चे हेड एच.आर. मा .श्री गजानन पाटील, पॉलीबॉन्ड इंडिया चे डेपोटी जनरल मॅनेजर एच.आर. प्रीती वर्मा या सर्वानी उपस्थितना मार्गदर्शन केले .
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट पिंपरी चिंचवड चाकण चाप्टरचे चेअरमन श्री नवनाथ सूर्यवंशी यांनी भाषणामध्ये भारतरत्न पद्मभूषण स्वर्गीय रतन टाटा साहेब यांना श्रद्धांजली वाहिली व त्यांचा आतापर्यंतचा कार्यकाळ व देशासाठी आणि इंडस्ट्रीसाठी असलेले भरीव योगदान याबाबत माहिती दिली. तसेच . त्याचप्रमाणे एन आय पी एम ही संस्था सदैव एच आर प्रतिनिधींना विविध शासकीय योजना तसेच एच आर अधिकारी विकासाकरता कटिबद्ध असल्याचे सांगितले . तसेच त्यांनी ग्रामतरंग या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मा श्री रमेश रासकर यांचे अभिनंदन करून भविष्यात असे अनेक चर्चासत्रे घेण्याकरता ग्रामतरंग व्यवस्थापनास विनंती केली .
राष्ट्रीय प्रशिक्षुता प्रशिक्षण योजना (NATS) ही योजना इंडस्ट्रीसाठी व तरुण शिकाऊ उमेदवार करीता कशा पद्धतीने फायद्याची असून एच आर प्रतिनिधी यांनी त्यांचे अडीअडचणी सोडविण्याकरता श्रीयुत वडोदे साहेब यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान चाकण इंडस्ट्रियल असोसिएशन सचिव मा. श्री . दिलीप बटवाल यांनी केले . इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या विविध समस्या साठी सुद्धा चाकण इंडस्ट्रियल असोसिएशन सी संपर्क करावा असे आव्हान केले .
यावेळी टेनेको क्लीन एअर इंडिया चे मा श्री तुषार पवार, बजाज ऑटो लिमिटेडचे सोमनाथ चडचने व मुस्कान अरोरा, कोजीमी प्रिसिजनचे उल्हास कलाल , व्हारोकचे आधार पाटील, अल्फा लावल - मुकेश वायकर, कावासाकी चे नामदेव जाधव डुकाटी एनर्जी चे मनोज जोशी, सुप्रीम ट्रेओन च्या प्रज्ञा देशपांडे, बगॉस ऑटो या सारिका एरंडोल, महाले इंजिनिअरिंग लिमिटेड. च्या सिल्की जगीरा व झेनसोल सिध्दी जोशी उपस्थित होते .तसेच अमोल कागवडे , संजय चेत्री , सुप्रिया गोरे ,परेश विर्डिकर,डॉ. अतुल कुमार , प्रो. अंबुज गुप्ता उपस्थित होते .
सेंचुरियन यूनिवर्सिटी - ग्रामतरंग चे जनरल मॅनेजर श्रीयुत रमेश रासकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात पिंपरी - चिंचवड , चाकण , रांजणगाव , शिक्रापूर , सणसवाडी , शिरवळ , सातारा यांचे स्वागत केले तसेच दरम्यान ग्रामतरंग या संस्थेचे महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्र बाहेर २५ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी हे ४५० पेक्षा जास्त नामवंत कंपन्यात कार्यरत असल्याचे सांगितले . राष्ट्रीय प्रशिक्षुता प्रशिक्षण योजना (NATS) ही योजना राबवत असताना कोणत्याही स्वरूपाची अडचण अली तर ग्रामतरंग मॅनॅजमेण्टशी संपर्क साधावा असे आव्हान रमेश रासकर यांनी केले .
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पार पाडण्याकरता ग्राम तरंग या संस्थेचे सर्व कर्मचारी व अधिकारी वृंद यांनी प्रयत्न केले व मा श्री . रंगनाथ कापरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.