पुणे : हिंजवडी एम.आय.डी.सी.पुणे येथील ओम्नि अॕक्टिव्ह हेल्थकेअर टेक्नॉलॉजी प्रा.लि. (Omni Active Healthcare Technology Pvt. Ltd.) कंपनी व्यवस्थापन आणि भारतीय कामगार सेना यांच्या मध्ये दि.०३ जुन २०२४ रोजी २ रा (दुसरा) त्रैवार्षिक वेतनवाढ व अन्य सोयीसुविधा करार ९ महिन्याच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पूर्णतः आनंदी वातावरणात पार पडला असून एकूण २५ कंत्राटी कामगारांना कंपनीमध्ये कायमस्वरूपी करण्यात आले आहे. सदर करार डॉ.रघुनाथ कुचिक शिवसेना उपनेते (उबाठा), सरचिटणीस भारतीय कामगार सेना यांच्या उपस्थितीत पार पडला.
कराराची ठळक वैशिष्ट्ये :-
करार कालावधी :- वेतनवाढ करार दि.१ सप्टेंबर २०२३ ते दि.३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत राहील.
पगारवाढ :- ३ वर्षासाठी कामगारांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या रू.१५५००/ इतकी पगारवाढ मिळणार आहे.
फरक रक्कम :- दि.०१ सप्टेंबर २०२३ रोजी पासूनचा सर्व लागू झालेल्या सोईसुविधा १००% फरक देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
त्याचबरोबरअटेंडन्स बोनस,बोनस, किरकोळ रजेमध्ये ३ रजांची वाढ, वार्षिक सहल,महागाई भत्ता,एल टी ए भत्ता, मेडिकल भत्ता, कर्ज सुविधा, वैद्यकीय विमा, इत्यादी सुविधा कंपनीतील कामगारांना देण्याचे कंपनी व्यवस्थापनाने मान्य केले आहे.
तसेच कंपनी व्यवस्थापनाने कंपनी मध्ये काम करणाऱ्या एकूण २५ कंत्राटी कामगारांना कंपनीच्या हजेरी पटलावर घेऊन कायमस्वरूपी करून कामगार हिताचा निर्णय घेतल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
करार यशस्वी करण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाचे वतीने प्लांट हेड अंबू गांधी, एच.आर.हेड अभय तुळापुरकर, एच.आर. अभिजीत थोरात,अतुल देवकर तसेच संघटनेच्या वतीने शिवसेना नेते अध्यक्ष खा. अरविंद सावंत, भारतीय कामगार सेना कामगार नेते, प्रदेश सरचिटणीस डॉ.रघुनाथजी कुचिक, कार्याध्यक्ष अजितदादा साळवी, सहचिटणीस शुभम दिघे, सदस्य तेजस गरसुंद, कामगार युनिट प्रतिनिधी अध्यक्ष बाजीराव शिंदे, उपाध्यक्ष आबासाहेब यादव, सचिव मच्छिंद्र कळमकर, सहसचिव पवन कांबळे, खजिनदार योगेश पाडेकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
संघटनेच्या सर्व कामगारांनी राखलेला संयम व दिलेले सहकार्य तसेच महत्वाचे म्हणजे संघटना व संघटनेच्या पदाधिकारी यांच्यावर कामगार सभासदांचा असणारा अभूतपूर्व विश्र्वास व संघटनेच्या हितासाठी काहीही करण्याची तयारी व कंपनीचा कामगारांच्या कौशल्य, गुणवत्ता, शिस्त यावर पूर्ण विश्वास या सर्व बळावर करार संपन्न झाला.
