महाराष्ट्र राज्यातील “यंंत्रमाग उद्योग” ( Employment in Power Loom Industry) रोजगारात कामगारांचा किमान वेतन दर पुनर्निर्धारित करण्याचा अधिसूचना मसुदा प्रसिद्ध

महाराष्ट्र राज्यातील “यंंत्रमाग उद्योग” ( Employment in Power Loom Industry अनुसूचित उद्योग नंबर ३७ ) रोजगारात कामांवर असलेल्या कामगारांंना देय असलेले किमान वेतन दर पुनर्निर्धारित करण्याबाबतचा प्रस्ताव अंंतर्भूूत असलेेली जी अधिसूूचना काढण्याचे प्रस्ताावित केलेले आहे, त्या अधिसूचनेचा पुढील मसुुदा प्रसिध्द करण्यात आलेला आहे.

त्याद्वारे अशी सूूचना देण्यात आली आहे की, महाराष्ट्र शासन राजपत्रात सदरहूून अधिसूूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्यानंंतर महाराष्ट्र शासन उक्त मसुदा विचारात घेतला जाईल.

उक्त मसुद्याच्याा संबंधांत उपरोक्त कालावधी संपण्यापूर्वी कोणत्याही व्यक्तींकडून जे कोणतेहीे अभिवेदन कामगार आयुुक्त, कामगार भवन, ई ब्लॉक, सी-२०, बांंद्रा-कुर्ला संकुंल, बांद्रा (पूू.), मुंंबई ४०० ०५१ यांंचेकडून येेईल ते शासनाकडून विचारात घेेण्यात येेईल.

उद्योगातील किमान वेतन दर वेळेवर पुनर्निर्धारित न केल्यामुळे कामगारांचे होते आर्थिक नुकसान -

 “यंंत्रमाग उद्योग” ( Employment in Power Loom Industry) हया अनुसूचित उद्योगातील कामगारांचे मागील किमान वेतन हे (revised) २९ जानेवारी २०१५ साली झालेले होते. किमान वेतन अधिनियम प्रमाणे हया अनुसूचित उद्योगातील कामगारांचे किमान वेतन दर ५ वर्षांनी पुनर्निर्धारित व्हायला हवं होतं, तसं न होता आता शासनाने चक्क जवळपास ०९ वर्ष ४ महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर आता revised करण्या‌ संबंधीचा मसुदा जाहिर केलेला आहे. साधारणपणे अजुन २-३ महिन्यांचा कालावधी हया संपुर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी लागेल. व त्यानंतर किमान वेतन दर पुनर्निर्धारित होणार आहे. 

      किमान वेतन दर ५ वर्षांनी पुनर्निर्धारित होत नसल्यामुळे लाखो कामगारांचे आर्थिक नुकसान होते, याचा विचार शासनाने केला पाहिजे.

“यंंत्रमाग उद्योग” (Employment in Power Loom Industry) किमान वेतन दर पुनर्निर्धारित करण्याचा अधिसूचना मसुदा पाहण्यासाठी - क्लिक करा