बल्लारपूर : बामणी प्रोटीन उद्योग पूर्णपणे बंद करण्याचा कंपनी व्यवस्थापनाचा निर्णय कामगारांवर अन्यायकारक असल्याचे कामगार नेता दिनेश गोंदे यांनी आरोप केले आहे. प्रदूषणाचा नावाखाली प्रसिद्ध उद्योग बंद पडल्यामुळे शेकडो लोकांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. बल्लारपूर तालुक्यातील बामणी गावातील बामणी प्रोटीन्स लिमिटेड आणि भद्रावती तालुक्यातील बेलगाव येथील सनफ्लॅग स्टील अँड मेटल या कंपनीवर पर्यावरणवादी राजेश बेले यांच्या तक्रारीवरून उद्योग बंद करण्याची पाळी आली असे वृत्त विदर्भ न्यूज एक्स्प्रेस यांनी दिले आहे.
कामगार युनियन किंवा कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीररित्या बामणी प्रोटीन्स व्यवस्थापनाकडून १९ मे २०२४ ला टाळे बंदीची कारवाई करण्यात आली. कामगार युनियन यांच्या मते ही कारवाई कामगार कायद्याच्या विरोधात जाऊन करण्यात आली क्या करिता व्यवस्थापनाने शासनासोबत प्रशासनाचा कोणत्याही परवानगीची वाट पाहिली नाही.
एकीकडे जगभरात रोजगाराची समस्या भयानक रूप धारण करीत असताना दुसरीकडे चालू उद्योग बंद होणे हे दुर्भाग्यपूर्ण आहे. जिल्ह्यातील उद्योग एक एक करून बंद होत असताना प्रशासन आणि राजकीय नेते याबाबतीत उदासीन दिसून येत आहे, जिल्ह्यातील उद्योग बंद झाल्यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असे हजारो लोकांचे रोजगार संपण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनेक कामगार आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आलेली आहे.
कामगारांच्या मुलांना बाळांच्या शिक्षणाचा प्रश्न एरणीवर येऊन टांगलेला आहे, जर जिल्ह्यातील उद्योगातील बंद होत राहिले तर विकासाच्या नावाखाली जो आज गाजावाजा होत आहे त्याचा काय उपयोग ? विकास पुरुषांच्या जिल्ह्यात जर सामान्य माणसावर या प्रकारचा अन्याय होत असेल तर कामगारांनी कुणाकडे आशेने बघायचे हा प्रश्न कामगारांना मार्फत विचारल्या जात आहे, याबाबत शासनाने आणि राजकीय नेत्यांनी मध्यस्थी करून यावर तोडगा काढावा अशी कामगारांची भावना व्यक्त होत आहे.
