मेग्ना कास्टिंग व मशीन वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड (Magna Casting and Machine Works Pvt Ltd) येथे वेतन वाढ करार संपन्न

भोर : येथील एमआयडीसी मधील वेळू येथील मेग्ना कास्टिंग व मशीन वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये ३९ कायमस्वरूपी कामगार कार्यरत असून ते भारतीय कामगार सेना या संघटनेची संलग्नित आहेत. भारतीय कामगार सेना व मेग्ना कास्टिंग व मशीन्स वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व्यवस्थापन यांच्या पुढाकाराने कामगारांच्या वेतन वाढीसाठी बोलणी चालू होती. ज्या यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या असून या कराराचा लाभ हा ३९ कायमस्वरूपी कामगार यांना मिळणार आहे. 

      भारतीय कामगार सेना व मेग्ना कास्टिंग व मशीन वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी  व्यवस्थापना मधील समन्वयाने कंपनीतील कामगारांचा त्रैवाशिक वेतन वाढ करार संवाद पूर्ण वातावरणात नुकताच संपन्न झाला. नवीन करारानुसार कामगारांना प्रत्यक्ष वाढ रुपये १०५००/- व अप्रत्यक्ष वाढ रुपये ११६००/-(रजेच्या काळातील प्रवास व वैद्यकीय भत्ता वाढ ,त्यातील फरक, वैद्यकीय विमा यांचे प्रीमियम इत्यादी) इतकी पगारवाढ आणि विविध सवलती मध्यांमध्ये वाढ देण्यात आली. 

      गेल्या काही वर्षात कंपनीतील वातावरण संवाद पूर्ण करण्यासाठी मेग्ना कास्टिंग व मशीन वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व्यवस्थापन व भारतीय कामगार सेना यांनी संयुक्तिक व सांघिक प्रयत्न केले यामुळे कामगार व व्यवस्थापन असे दोन पक्ष न राहता एक संघ एक कंपनी ही संकल्पना अस्तित्वात आली. याच सर्व कर्स प्रयत्नामुळे यावर्षीचा वेतन करार हा फक्त तीन मीटिंग इतक्या कमी कालावधीत पूर्ण झाला. 

      या आधीचा कंपनी व कामगार यांच्यातील करार हा दिनांक ३१-१२-२०२३ रोजी कायद्यातील तरतुदीनुसार संपुष्टात आला. भारतीय कामगार सेना यांनी युनिट प्रतिनिधींमार्फत दिनांक १२-०१-२०१४ मागणी पत्र व्यवस्थापनास सादर केले यावर वेळोवेळी चर्चा करण्यात येऊन दिनांक १५-०५ २०२४ रोजी करारावर स्वाक्षरी करण्यात आली. 

      भारतीय कामगार सेना व मेघा कास्टिंग मशीन्स वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व्यवस्थापना मधील हा दुसरा त्रिवार्शिक वेतन वाढ करार असून या पगारवाढ यासह प्रवास व वैद्यकीय भत्ता हा एक बेसिक करण्यात आला आहे. तसेच रात्रपाळी भत्त्यात वाढ, वैयक्तिक, शैक्षणिक कर्जत वाढ, वैद्यकीय विमा यांच्यातील वाढ, उलाढाल निगडित बोनस, तसेच इतर सेवा सवलती देण्यात येणार आहे.

     या करारासाठी कंपनी व्यवस्थापनाद्वारे श्री. सुधीर पुराणिक- संचालक, श्री. रामचंद्र कळसासी- सल्लागार, श्री. शिवाजी चौंडकर- मानव संसाधन प्रमुख, श्री. सिद्धार्थ जाधव- मानव संसाधन व्यवस्थापक यांनी स्वाक्षरी केली. व हा करार करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. 

     भारतीय कामगार सेना मॅग्ना कास्टिंग व मशीन वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड युनिट प्रतिनिधी यांच्यातर्फे श्री. रघुनाथ कोचिंग -भारतीय कामगार सेना सरचिटणीस, युनिट प्रतिनिधी श्री. धनाजी सुर्वे,श्री.अनिल वाडकर, श्री. दादासाहेब माने, श्री. अंकुश चन्नागिरी, श्री. हनुमंत शिंदे यांनी स्वाक्षरी केली.

      हा करार यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या ज्या सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळाले अशा सर्वांचे भारतीय कामगार सेनेतर्फे आभार व्यक्त करण्यात आले.