1 एप्रिल 2024 पासून PF, NPS, इन्कम टॅक्स नियमात बदल !

आर्थिक वर्षाची सुरुवात झाली की 1 एप्रिलपासून त्या आर्थिक वर्षासाठीचे बदल, नवीन नियम लागू होतात. पाहूयात या नवीन आर्थिक वर्ष 2024-25 साठी कोणते नियम लागू होतायेत.

एम्प्लॉईज प्रॉव्हिडंड फंड ऑर्गनायझेशन (EPFO)

EPFO म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंड फंड ऑर्गनायझेशनच्या नियमातही बदल होणार आहेत. तुम्ही नोकरदार असाल तर प्रॉव्हिडंड फंड बॅलन्स हा आता आपोआप नवीन संस्थेसोबतच्या खात्यात ट्रान्सफर होईल. म्हणजे तुम्ही जुनी नोकरी सोडून नव्या नोकरीत रुजू झालात, तर तुम्हाला PF ट्रान्सफर ची प्रक्रिया करावी लागणार नाही.

नॅशनल पेन्शन स्कीम

NPS म्हणजेच नॅशन पेन्शन स्कीम साठीच्या सुरक्षेसाठीच्या नियमांत बदल करण्यात आलेत. आणि आता इथे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन करावं लागेल. म्हणजे पूर्वीसारखं फक्त पासवर्ड भरून लॉगिन करता येणार नाही. त्यामुळे तुमच्या या खात्याचा ॲक्सेस दुसऱ्या कुणाच्या हाती सहज पडणार नाही.

तुम्हाला आधार नंबर व्हेरिफाय करावा लागेल आणि तुमच्या मोबाईल येणारा OTPही वापरावा लागेल, त्यानंतर तुम्ही तुमच्या खात्याचे तपशील पाहू शकाल.

इन्कम टॅक्स

1 एप्रिल 2024 पासून प्राप्तिकराची - न्यू टॅक्स रेजिम (New Tax Regime) ही Default असेल. म्हणजे तुम्ही याच पद्धतीने कर भरणार असं गृहित धरलं जाईल.

तुम्हाला जुन्या म्हणजेच Old Tax Regime ने करमोजणी करायची असेल, तर तुम्हाला तुमच्या कंपनीला तसं सांगावं लागेल.

न्यू टॅक्स रेजिमचे टॅक्स स्लॅब्स असतील :
  • 3 लाखांपर्यंत - 0%
  • 3-6 लाख - 5%
  • 6-9 लाख - 10%
  • 9-12 लाख - 15%
  • 12 ते 15 लाख - 20%
  • 15 लाखांच्या वरील उत्पन्न - 30%