अल्फ इंजिनीअरिंग प्रा. लि. (ALF Engineering Pvt Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

चाकण : चाकण औद्योगिक वसाहाती मधील निघोजे चाकण येथील अल्फ इंजिनीअरिंग प्रा. लि. (ALF Engineering Pvt Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये झालेल्या तिसऱ्या वेतनवाढ करार संघटनेचे प्रमुख सल्लागार आमदार पै. महेशदादा लांडगे, प्रमुख सल्लागार पै.रोहिदास गाडे पाटील, संघटनेचे  अध्यक्ष जीवन येळवंडे, कंपनीचे डायरेक्टर पियर डिसूजा, प्लॅन्ट हेड विनोद टिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शुक्रवार दिनांक  २२/०३/२०२४ रोजी पूर्णत्वास आला  आहे.

करारामध्ये झालेले ठळक मुद्दे खलील प्रमाणे :-

करार कालावधी : दि. ०१/१२/२०२२ ते ३०/११/२०२५ या तीन वर्षांचा राहील.

एकूण पगारवाढ : रु.१२,८०१/- ( बारा हजार आठशे एक रुपये) 

पगाराचा रेशो : पहिल्या वर्षी ६०% दुसऱ्या वर्षी २०% तिसऱ्या वर्षी २०% मिळणार.

फरक रक्कम : १५ (पंधरा ) महिन्याचा फरक देण्यात येईल.

मेडिक्लेम पॉलीसी : कुटुंबासाठी ३,००,०००/- रुपयांची पॉलिसी राहणार असून संपूर्ण खर्च कंपनी करणार या पॉलिसी मध्ये स्वतः, पत्नी, मुले यांचा समावेश करण्यात येणार आहे.

मृत्यू साहाय्य योजना :
अ) मृत्यू झाल्यास सर्व कामगारांचा एक दिवसांचा पगार व जादाचा मोबदला म्हणून ३,००,०००/- (तीन  लाख) रुपये पॉलिसी कंपनीकडून कायदेशीर वारसास मिळणार.
ब) एखाद्या कामगाराचा अपघात होऊन अपंगत्व आल्यास युनियन सोबत चर्चा करून त्यास मदतनिधी व योग्य त्या ठिकाणी कामावर ठेवण्यात येईल.

ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी : २४ तास कव्हर असणारी १०,००,०००/- (दहा लाख) रुपयांची पॉलिसी देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

सूटया : A) PL - २१, B) SL - ०८, C) CL - ०८, D) PH - १०

मतदानाची सुट्टी :  सरकारी आदेशानुसार राहील,

दिवाळी बोनस : सर्व कामगारांना दिवाळी बोनस हा मार्च महिन्याचा ग्रॉस पेमेंट देण्यात येईल. 

दसरा भेटवस्तू : दसऱ्याच्या दिवशी एक किलो मिठाई  देण्याची मान्य झाले आहे.

सेवा बक्षीस : A) १० वर्षे नोकरी १००००/-, B) २५ वर्ष नोकरी २५०००/-

वैयक्तिक कर्ज सुविधा : प्रत्येक कामगारा रु.१,००,०००/- (एक लाख रुपये) देण्यात येईल.

ड्रेस : a) पूर्ण ड्रेस - २, b) शूज - उच्च प्रतीचा देण्याचे मान्य,

गुणवंत कामगार पुरस्कार : प्रत्येक वर्षी एक गुणवंत कामगारांची निवड करून त्यांना प्रत्येकी रु.१०,०००/- ( दहा हजार) रुपये एवढी रक्कम प्रशस्तीपत्र व ट्रॉफी बक्षिस म्हणून देण्याचे मान्य करण्यात आले.

भत्ता : तिसरे पाळीसाठी ६५/- रुपये पाळी भत्ता देण्याचे मान्य.

कॅन्टीन आणि बस सुविधा :
A) नाश्त्याची सुविधा चालू करण्यात आली आहे. 
B) सर्व कामगारांना बस सुविधेचा फायदा मिळणार
C) ज्या ठिकाणी दहा कामगार राहत असेल तेथून बस सुविधा चालू करण्यात येईल.

      करारावरती  संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार पै.  महेशदादा लांडगे, प्रमुख सल्लागार पै. रोहिदास गाडे पाटील, संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे, सरचिटणीस कृष्णा रोहोकले, उद्योजक राजुशेठ बोत्रे, चिटणीस रघुनाथ मोरे, खजिनदार अमृत चौधरी, दत्तात्रय गवारी, प्रशांतआप्पा पाडेकर, रविंद्र भालेराव, सोमनाथ जानराव, गृपो कंपनीचे युनिट अध्यक्ष संजय पाटील, युनिट अध्यक्ष किशोर गोरखा, उपाध्यक्ष योगेश गाढवे, सरचिटणीस महेंद्र लाड, चिटणीस सुदाम गुळवे, खजिनदार राजेश सिंग, संघटक गणेश पवार, योगेश व्यवहारे, व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे डायरेक्टर पियर डिसूजा, प्लॅन्ट हेड विनोद टिपरे, एच. आर. मॅनेजर गंगाधर लहाने यांनी सह्या केल्या. 

      संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार पै. माहेशदादा लांडगे, अध्यक्ष जीवन येळवंडे व कंपनी डायरेक्ट श्री. पियर डिसूजा यांनी उपस्थित कामगार बंधू व व्यवस्थापन यांना मोलाचे मार्गदर्शन केले, प्रास्ताविक प्लॅन्ट हेड विनोद टिपरे तसेच सूत्रसंचालन सौ. पुजाताई थिगळे यांनी केले व सरचिटणीस कृष्णा रोहोकले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. कामगारांनी डीजेच्या तालावर नाचून, पेढे वाटून फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्येक्त केला.