कामगारांचे प्रश्न लोकसभेत, मांडण्यासाठी उमेदवारी द्या !

पिंपरी चिंचवड : मावळ लोकसभा मतदार संघात ६० टक्के कामगार आहेत, त्या कामगारांचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी मला भाजपतर्फे मावळ मधून उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भाऊ भोसले यांनी पिंपरी येथील भरगच्छ पत्रकारपरिषदेत केली आहे.

कामगार नेते यशवंतभाऊ भोसले हे गेली २९ वर्षापासून कार्यरत असून ९ वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे सक्रिय सदस्य आहेत. शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळावर आणि श्रम मंत्रालय कामगार कायदे पुनर्गठन समिती नॅशनल फ्रंट ऑफ इंडियन ट्रेड युनियन या भारतीय जनता पार्टीच्या संलग्न असलेल्या कामगार संघटनेच्या उपाध्यक्ष म्हणून समितीवर सदस्य यशवंतभाऊ हे काम पाहत आहेत.

पिंपरी चिंचवड, तळेगाव, उरण, पनवेल या भागात मोठे उद्योग असून कामगार वर्ग मोठा आहे. श्रमिकांना प्रतिनिधित्व द्यावे, मावळची जागा भाजपने घ्यावी आणि आपल्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी करत भोसले म्हणाले की, राज्यात 60 ते 70 टक्के कामगार आहेत. तो संघटित आहे. त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आवाज उठविण्यासाठी श्रमिकांचा लोकसभेत प्रतिनिधी असावा, अशी कामगारांची भावना असून त्यांच्या कामगारांच्या प्रश्नांसाठी मला उमेदवारी द्यावी मी शंभर टक्के विजयी होवू शकतो असा आत्मविश्वास यशवंत भाऊ भोसले व्यक्त केला आहे.