पुणे : रविवार दिनांक 17 मार्च 2024 रोजी एन आय पी एम चा 44 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आकुर्डी येथील किरीयाड हॉटेलमध्ये साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर एन. आय. पी. एम. (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट) पिंपरी चिंचवड चाकण चाप्टर चे चेअरमन नवनाथ सूर्यवंशी, पुणे चाप्टरचे चेअरमन कल्याण पवार, एन आय पी एम पिंपरी चिंचवड चाकण चाप्टरचे जनरल सेक्रेटरी अभय खुरसाळे तसेच राष्ट्रीय विभागीय व्हॉइस प्रेसिडेंट नरेंद्र पाटील उपस्थित होते.
नवनाथ सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमाचे औचित्य साधून एन आय पी एम च्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाचे नियोजना संदर्भात माहिती दिली व उपस्थित सर्व एच क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांना एन आय पी एम पिंपरी चिंचवड चाकण चाप्टर आयोजित वेस्टर्न रिजन कॉन्फरन्स यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले.
एनआयपीएम (NIPM) पिंपरी चिंचवड चाकण चाप्टरचे अतिरिक्त जनरल सेक्रेटरी चेतन मुसळे यांनी पिंपरी चिंचवड चाकण चाप्टरचा स्थापनेपासून तर नुकत्याच यशस्वीरित्या पार पडलेल्या वेस्टन रीजन कॉन्फरन्स पर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला.
एनआयपीएम (NIPM) पिंपरी चिंचवड चाकण चाप्टर ने नुकत्याच आयोजित केलेल्या वेस्टन रिजन कॉन्फरन्सच्या आयोजनाबद्दल व त्याच्या यशाबद्दल कल्याण पवार यांनी सर्व कमिटीचे विषेश कौतुक केले तसेच एच चार क्षेत्रामध्ये सुरू असलेले भरीव कार्य व या क्षेत्रात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मिळालेले ज्ञान व इंडस्ट्रीमध्ये इंटर्नशिप च्या माध्यमातून मिळणारे ज्ञान यातील तफावत भरून काढण्याचे भरीव कार्य एन आय पी एम च्या माध्यमातून अविरत केले जात आहे व याचा फायदा इंडस्ट्री व विद्यार्थी या दोघांनाही होत असल्याचे दिसून येते अशी भावना एन आय पी एम पुणेचे चेअरमन कल्याण पवार यांनी याप्रसंगी व्यक्त करून उपस्थितांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच भविष्यात एच आर क्षेत्रातील अधिकाऱ्यांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी एन आय पी एम पुणे व पिंपरी चिंचवड चाकण चाप्टर हे एकत्र काम करेल अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी व्यासपीठावरून दिली.
एनआयपीएम (NIPM) चे राष्ट्रीय विभागीय व्हॉइस प्रेसिडेंट नरेंद्र पाटील हे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, इतर क्षेत्रातील व्यावसायिक चार्टर प्रमाणे एच चार क्षेत्रातील अधिकाऱ्यांना सुद्धा एच आर ला व्यावसायिक दर्जा मिळावा व डॉक्टर किंवा वकील यांच्याप्रमाणे एच आर अधिकाऱ्यांनाही चार्टर म्हणून सरकारने मान्यता द्यावी यासाठी आमचे शासन दरबारी प्रयत्न चालू असल्याची माहिती याप्रसंगी त्यांनी दिली व या कार्यक्रमाच्या आयोजन संदर्भात त्यांनी पिंपरी चिंचवड चाकण चाप्टर कमिटीचे मनापासून कौतुक केले व वर्धापन दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
तसेच एन आय पी एम चा अविभाज्य घटक होण्यासाठी उपस्थितांना सभासद होण्याचे आवाहन केले व वर्धापन दिनानिमित्त दिनांक ३१ मार्च २०२४ पर्यंत लाईफ मेंबर झाल्यास सभासद नोंदणी शुल्कामध्ये मध्ये 50% सूट देत असल्याचेही त्यांनी याप्रसंगी जाहीर केले.
या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली, त्याचप्रमाणे ह्या महिन्यातील ०८ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून याप्रसंगी एच आर क्षेत्रातील महिला अधिकारी, कर्मचारी व सभासद यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी एन आय पी एम पिंपरी चिंचवड चाकण चाप्टर चे माजी चेअरमन तुषार टोंगळे, मुळशी इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष सतीश करंजकर, व्ही एच आर चे संस्थापक अध्यक्ष शंकर साळुंखे, डॉ. शरद जोशी, सुनील गोसावी, धैर्यशील देसाई, दशरथ पदमे, प्रणाली देशमुख, अमित देशपांडे, दीपक खोत, स्वप्निल पवार, सुनील गोसावी, संजय वाघमारे या सर्वांची विशेष उपस्थिती लाभली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन आय पी एम पिंपरी चिंचवड चाकण चाप्टर चे संस्थापक अमोल कागवाडे, चेअरमन नवनाथ सूर्यवंशी, जनरल सेक्रेटरी अभय खुरसाळे, खजिनदार प्रदीप मानेकर, व्हाईस चेअरमन सतीश पवार, अतिरिक्त जनरल सेक्रेटरी चेतन मुसळे, एक्झिकेटीव कमिटी मेंबर राहुल निंबाळकर, मधुकर सूर्यवंशी, रमेश बागल, सावित्री गोसलवाड, श्वेथा शेट्टी, अर्जुन माने, शितल इंगळे, यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमास १०० हून अधिक सभासदांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल निंबाळकर यांनी तर उपस्थितांचे आभार सतीश पवार यांनी मानले.